आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पैसा उभारा, नहर दुरुस्त करा आणि पाणी मिळवा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - दुष्काळात थेंब थेंब पाण्याचे मोल आहे. कुशल प्रशासक अशी ओळख असलेल्या मलिक अंबरने निर्माण केलेली नहर-ए-अंबरी आजही औरंगाबादकरांसाठी वरदान ठरली आहे. राज्य शासन, स्वयंसेवी संस्था आणि येथील उद्योजकांनी पैसा देऊन मोठा निधी उभारल्यास या नहरीचे पुनरुज्जीवन सहज होऊ शकते. दुष्काळाच्या झळा सोसणार्‍या लाखो नागरिकांना ती नवसंजीवनी देऊ शकते, असे जलतज्ज्ञांनी स्पष्ट केले.

समांतरवर अब्जावधी खर्च करण्यापेक्षा नैसर्गिक स्रोतांची डागडुजी केली तर अधिक फायदा होऊ शकतो. 400 वर्षांपूर्वी दोन ते तीन लाख लोकांना पुरेल एवढे पाणी नहरीद्वारे घरापर्यंत पोहोचवले जात होते. त्यासाठी परिपूर्ण यंत्रणा होती. शहरात अखेरच्या टोकापर्यंत पाण्याचा दाब राहावा म्हणून बंब बांधले होते. डोंगरांवरून वाहत येणार्‍या पाण्यातून गाळ, कचर्‍याचा निचरा व्हावा म्हणून सेटलिंग टँक बांधले होते. पण अतिक्रमण व बांधकामांमुळे त्यांची मोडतोड झाली. या यंत्रणेचे पुनरुज्जीवन केल्यास नहरीद्वारे जुन्या क्षमतेने पुरवठा शक्य असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

कुठे मिळत होते पाणी : त्या काळी महेमूदपुरा, पीपल कट्टा, नवखंडा, भडकल, कुंभारवाडा, आमखास मोहल्ला, जुना बाजार, किलेअर्क, सिटी चौक, जाधवमंडी, शहागंज, कुंवारफल्ली, देवडी बाजार, सराफा, नवाबपुरा, चौराहा, चेलीपुरा, कोटला शहा, फाजलपुरा, शहाबाजार, मोहल्ला, राजासाहब आदी भागांत नहरीचे पाणी साठवण्यासाठी हौद बांधले होते. याशिवाय नहरीच्या पाइपलाइनचे कनेक्शन जुन्या शहराच्या इतर भागांतही देण्यात आले होते.

81 वर्षांपूर्वी झाली होती दुरुस्ती : हॉटेल ताजसमोर गायमुख आहे. तेथे शिलालेखावर उर्दूमध्ये 1931 मध्ये (81 वर्षांपूर्वी) नहरीची प्रथम स्वच्छता झाल्याची नोंद आहे. ही मोहीम वर्षभर चालली. त्यात नहरीचे सर्व 100 मेनहोल उघडले होते. त्यावर जमिनीपासून चार ते सहा फूट उंचीपर्यंत बांधकाम केले. गायमुखापुढील सेटलिंग टँकचे बांधकाम करून जीर्ण चिनीमातीच्या पाइपच्या जागी लोखंडी पाइप टाकण्यात आले.

काय आहे गायमुख : लाल दगडात कोरलेल्या गायीच्या तोंडातून नहरीचे स्वच्छ पाणी हौदात पडायचे म्हणून त्याला गायमुख म्हटले जाते. पहिल्या मेनहोलपासून गायमुखापर्यंत जमिनीची पातळी 41.5 फूट खोल असल्याने वीजपंपाचा वापर न करताच गुरुत्वाकर्षणाने (सायफन सिस्टिम) नहरीचे पाणी गायमुखापर्यंत येते. सध्या गायमुखाची निगा राखण्याची जबाबदारी कुणावरही नाही. गायीची प्रतिकृती असलेल्या हौदाची तोडफोड झाली असून तो मातीने बुजला आहे. शंभराव्या मेनहोलवरील लोखंडी ढापे गायब असून मेनहोलमध्येही दगड, विटा, माती, कॅरीबॅग आणि झाडांचा पाला साचला आहे.

दोन लाख लोकांना पाणीपुरवठा : पाणी साठवण्यासाठी शहरात 700 पेक्षा जास्त हौद बांधले होते. मशीद, मंदिर, देवडी, उद्याने, फळबागांमध्येही पाणी पोहोचत असे. आजही अनेक घरांत नहरीतून पाणीपुरवठा सुरू असून लोक याची माहिती दडवत असल्याचे अभ्यासक डॉ. रमजान शेख म्हणाले. शहरात सात ते दहा फूट खोल खोदकाम करताना ही नहर आढळते, असेही त्यांचे म्हणणे आहे.

अंबरी मनोरे : पाण्याचा दाब कायमस्वरूपी राहावा म्हणून शहरात 200 पेक्षा जास्त अंबरी मनोरे (बंबे) बांधले होते. कटकट गेट, उस्मानपुरा, दिल्ली गेट येथे आजही हे मनोरे दिसतात. चुना, विटांचा वापर करून चौकोनी किंवा गोल अशा 12 ते 30 फूट उंच मनोर्‍यांची उंची ही गायमुखातील पाण्याची पातळी व दाबाशी समतल आहे. त्यामुळे मनोर्‍यातून पाण्याचे समान वितरण करणे शक्य होते. अतिक्रमणे-बांधकामांचा फटका मनोर्‍यांना बसला. सध्या जेमतेम 30-35 ठिकाणीच ते दिसतात, असे डॉ. शेख यांनी सांगितले.

नहरीचे फायदे
> कोणत्याही खर्चाविना 2 एमएलडी पाणी. स्वच्छा, दुरुस्ती केल्यास ही क्षमता 5 एमएलडीपर्यंत जाऊ शकते.
> त्यानुसार दररोज एका माणसाला 135 प्रमाणे 44 हजार लोकसंख्येला पाणीपुरवठा होतो.
> नहरीची स्थिती पूर्वीसारखीच केली तर आजही कमीत कमी दोन लाख लोकसंख्येला पूर्वीच्या क्षमतेने पाणीपुरवठा करता येईल.
> नैसर्गिकरीत्या झर्‍यातून नहरीत पाणी येत असल्याने विजेच्या वापराची गरज नाही.
> यामुळे जायकवाडीवरील पाणीपुरवठय़ाचा शहराचा ताण मोठय़ा प्रमाणात कमी होईल.
> दुष्काळात पाण्याचा महत्त्वपूर्ण साठा म्हणून नहरीच्या पाण्याचा उपयोग होईल.
> दुरुस्ती आणि साफसफाई मोहिमेनंतर सुमारे 400 वर्षे जुन्या नहरीचे आयुष्य आणखी वाढवता येईल.

निझामकाळात नहरीतील पाणी साचवून स्वच्छ करण्यासाठी गायमुखाच्या दक्षिणेला रोजाबागसमोर सेटलिंग टँक (1931) तयार केला. गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून हा टँक कोरडा आहे. गायमुखापासून नॅशनल कॉलनीमार्गे 450 मि.मी. व्यासाचे काँक्रीटचे पाइप टाकून पाणी सेटलिंग टँकपर्यंत आणले. या ठिकाणी 12.20 बाय 12.50 मीटर च्या आणि 14 फूट खोल तीन टाक्या आहेत. त्यात एका वेळी 1.3 दशलक्ष घनमीटर पाणी साठवता येते. पहिल्या टाकीत पाणी साचले की, त्यातील गाळ, कचरा तळाला बसतो. नंतर पाणी दुसर्‍या आणि मग तिसर्‍या टाकीत जाते. निर्जंतुकीकरण झाल्यानंतर तिसर्‍या टाकीतून पाणी दिल्ली गेटच्या मनपा आयुक्तांच्या बंगल्यात सोडले जाते. रोजाबाग, गीतानगर, ग्रीन व्हॅली, नॅशनल कॉलनी, आझाद कॉलेज, किनो हाउसिंग सोसायटी, हिमायत बाग आदी भागांतही पाणीपुरवठा होत असे. गरजेनुसार 30 ते 40 टँकरद्वारे सेटलिंग टँकमधून पाणीपुरवठा होत असे.

सेटलिंग टँकमध्ये होत असे पाण्याचे शुद्धीकरण

नहरीच्या मार्गातील अडचणी
> भूमिगत नहर असल्याने कोणाकडेही नेमक ा नकाशा, माहिती नाही. नहरीवर जागोजागी बांधकाम करून अतिक्रमण केले आहे. जवळजवळ सर्वच भागांत नहरीतून पाणी चोरी करण्यात येते. 1931 नंतर आजपर्यंत दुरुस्ती व साफसफाई केलेली नाही.

शासनाने संरक्षण दिल्यास नहरीवरील अतिक्रमण आणि पक्केबांधकाम येईल. स्वच्छता आणि लिकेज दुरुस्ती वारसा समितीकडून केली जाईल. नहरीचा ताबा समितीकडे द्यावा, असा प्रस्ताव मनपा आयुक्तांमार्फत शासनाकडे पाठवणार.
डॉ. जयंत देशपांडे, अध्यक्ष, वारसा समिती

25 वर्षांपूर्वी वडील नोकरीत असताना आणि मी स्वत: 12 वर्षे सेटलिंग टँकवर लाइनमन म्हणून काम केले. दहा वर्षांपूर्वी या ठिकाणाहून एका दिवसात 40 हून अधिक टँकरमध्ये पाणी भरून दिले आहे. आजही सेटलिंग टँक सुस्थितीत आहे.
गोनाथ कार्के, सेवानिवृत्त कर्मचारी, सेटलिंग टँक

शरद भोगले, जलतज्ज्ञ
मनपा, शासनाकडे नहरीच्या दुरुस्तीसाठी यंत्रणा आहे.
नहरींची तपासणी होणे गरजेचे. नहर कुठे फुटली, कुठे अतिक्रमणे झाली, साचलेला गाळ, दगड आदींबाबत अभ्यास करावा लागेल.
नहरीवर यापुढे अतिक्रमण, बांधकाम होणार नाही यासाठी आताच उपाययोजना करावी लागेल.
समांतरसारख्या योजनेवर कोट्यवधी खर्च करण्याचीही तयारी आहे. नहरीला तर असा वारंवार होणारा कोणताही खर्च नाही.

डॉ. शेख रमजान, नहर-ए-अंबरीचे संशोधक
1931 पासून नहरीची सफाई झालेली नाही.
मेनहोलवर ढापे टाकून ते संरक्षित करावे.
पूर्ण नहरीची प्रत्यक्ष पाहणी करून त्याचे अद्ययावत रेकॉर्ड तयार करावे.
शासनाकडे पैसे नसल्यास प्रायोजक तत्त्वावर संस्था, उद्योजकांकडून निधी उभा करावा

दुरुस्ती आणि स्वच्छतेसाठी मनपाला सहकार्य हवे असल्यास करण्याची तयारी आहे.

दि. मा. मोरे, माजी महासंचालक, जलसंपदा
महापालिकेने ठरवले तर नहरीची दुरुस्ती अवघड नाही.
दुरुस्तीवर खर्च होईल. पण पाण्याची किंमत लक्षात घेता हा खर्च नगण्यच आहे.
मनपाने उगमस्थानापासून सर्वेक्षण, संरक्षण करावे.
जायकवाडीवरील ताण कमी होईल.