आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐतिहासिक वारसा: चार किलोमीटर नहरीतील पाणी वाया

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - नहर-ए-पाणचक्कीचा 54 क्रमांकाचा मेनहोल पूर्णत: बंद असल्यामुळे चार किमी लांब नहरीतील पाणी वाया जात असल्याचे नहरीचा अंतर्गत सर्व्हे करणार्‍या समितीला आढळून आले आहे.

जटवाडा येथून नहर-ए-पाणचक्कीचा उगम होतो. ओहर गाव, हसरूल तलाव ते पाणचक्की असा नहरीचा मार्ग आहे. 54 क्रमांकाचा मेनहोल पूर्ण बंद आहे. नहरीची एकूण लांबी 8 किमी आहे. मात्र 54 क्रमांकाचा मेनहोल बंद असल्याने चार किलोमीटर लांब नहरीतील पाणी वाया जात आहे. परिणामी पाणचक्कीच्या हौदातील पाणी कमी होत आहे. छावणीतील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी अधिकारी अनेक वर्षांपूर्वी नहर-ए-पाणचक्कीतून पाणी घेत होते. जायकवाडीतून छावणीला पाणी मिळाले, त्यामुळे नहरीतील पाणीपुरवठा बंद झाला. तेव्हापासून 54 क्रमांकाचा मेनहोल बंद आहे. हा मेनहोल मोकळा करणे आवश्यक आहे. तो खुला झाला तर बाराही महिने पाण्याचा प्रवाह येत राहील, असे डॉ. शेख रमजान शेख यांनी सांगितले. तसेच ओहर नदीत तीन विहिरी आहेत. त्यातून पाणचक्कीचा उगम होतो. डोंगरातून या नदीचा उगम झाल्याचेही त्यांनी सांगितले.