आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नकुल, दुर्गा मुकुंदपूरला रवाना; आनंदवनातील दोन बिबटे येण्याची शक्यता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिद्धार्थ उद्यानातील वाघाला मध्य प्रदेशात रवाना करण्यात आले. छाया : रवी खंडाळकर
औरंगाबाद - महानगरपालिकेच्या सिद्धार्थ उद्यानातील नकुल आणि दुर्गा या दोन पिवळ्या वाघांची शनिवारी मध्य प्रदेशातील मुकुंदपूर प्राणिसंग्रहालय तथा झुआलॉजिकल पार्क रेस्क्यू सेंटरमध्ये रवानगी झाली आहे. सकाळी साडेआठ वाजेपासून त्यांना पिंजऱ्यात टाकून वाहनात बसवण्यासाठी कर्मचाऱ्यांना दीड तास कसरत करावी लागली.

नर आणि मादीची ही जोडी मध्य प्रदेशात पाठवण्याबाबत जानेवारी २०१६ रोजी झालेल्या मनपाच्या सर्वसाधारण सभेची मान्यता घेण्यात आली होती. शनिवारी सकाळी सहा वाजेपासून पिंजरा लावण्यात आला होता. दीड तासाच्या अथक प्रयत्नांनंतर दोन्ही वाघ पिंजऱ्यात बंद करून हे पिंजरे वेगवेगळ्या वाहनांत चढवण्यात आले. यासाठी मनपाचे पाच मध्य प्रदेशातून आलेले सात कर्मचारी प्रयत्न करत होते. ही जोडी गेल्याने सिद्धार्थ उद्यानात सहा वाघ शिल्लक राहिले आहेत. सिद्धार्थ समृद्धीचे हे दोन वर्षांचे बछडे होते. या दोघांच्या बाजूच्या पिंजऱ्यात त्यांना ठेवले जात होते. त्यांच्या स्थलांतरामुळे सिद्धार्थ समृद्धीवर परिणाम होऊ नये म्हणून दोघांनाही पिंजऱ्यातून बाहेर काढण्यात आले नव्हते. यापूर्वी रिद्धी वाघिणीला पुण्याला पाठवण्यात आले आहे. पुढील आठवड्यात आनंदवनातून एक नर एक मादी असे दोन बिबटे सिद्धार्थ उद्यानात येण्याची शक्यता आहे. मनपाचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. बी. एस. नाईकवाडे नंदन यांच्या उपस्थितीत पिवळ्या वाघांची रवानगी झाली.
हजार १४ किमीचा प्रवास : नकुलआणि दुर्गाला घेण्यासाठी मध्य प्रदेशातून उप वन संरक्षक ज्योतिषी राज्य वन्यजीव पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मिश्रा आले होते. त्यांच्यासोबत सात कर्मचाऱ्यांचा ताफाही होता. त्यांना मध्य प्रदेशमध्ये जाण्यासाठी हजार १४ किमीचा प्रवास करावा लागणार आहे. त्यासाठी ३४ तास लागतील. सोबत दोन ट्रक, तीन जीपचा ताफा आहे.
आजोबायेथेच, नातू बाहेर : मनपाने२००६ मध्ये चंदिगड येथून गुड्डू आणि दीप्तीला प्राणी संग्रहालयात आणले होते. त्यानंतर त्यांना सिद्धार्थ, समृद्धी, रिद्धी आणि सिद्धी ही चार पिल्ले झाली होती. त्यातली रिद्धी पुण्यात आहे. सिद्धार्थ आणि समृद्धीला नकुल, दुर्गा आणि अर्जुन ही तीन पिल्ले झाली होती. त्यातील नकुल दुर्गाला बाहेर पाठवले असून अर्जुन उद्यानातच आहे. नकुल, दुर्गाचे आजी- आजोबा गुड्डू आणि दीप्ती सतरा वर्षांचे झाले असून ते सिद्धार्थ उद्यानातच आहेत.