आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXCLUSIVE: पंकजांनी भगवानगडावर भाषणाचा नाद सोडावा, महंतांची सशर्त तडजोडीची तयारी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- भगवानगडावर मेळावा अथवा अन्य कार्यक्रमानिमित्त भाषण करण्याचा हट्ट पंकजा मुंडेंनी सोडावा. झालेल्या वादावर आपोआप पडदा पडेल, अशी सशर्त माघारीची तयारी गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी दर्शवली आहे. दसरा व अन्य मेळावा घ्यायचा असेल तर भगवानगडाच्या पायथ्याला कुठेही घेण्यास आपली हारकत नाही, असे स्पष्टीकरण महंतांनी दिले.

दोन दिवसांपूर्वी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी महंतांनी उपस्थित केलेल्या काही मुद््द्यांवर स्पष्टीकरण देत आता या वादावर पडदा पडावा, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनीही सशर्त माघारीची तयारी दर्शवली आहे. मंगळवार, ता. 25 एप्रिल रोजी दिव्य मराठीशी बोलताना महंतांनी सांगितले, की पंकजा मुंडे यांनी गतवेळच्या दसरा मेळाव्यातच पुढील मेळावा गडावर घेण्याचे संकेत दिले होते. म्हणजेच येणारा दसरा मेळावा गडावर घेण्याची त्यांची तयारी असावी. वादाचे मूळच यात आहे. पंकजांनी गडावर भाषण करण्याचा नाद सोडावा. वाद आपोआप मिटेल. गोपीनाथगड नव्हता तोपर्यंत मुंडे साहेबांसह पंकजा व इतर संबंधित नेत्यांना या गडावर भाषण करण्यास मुभा होती. मात्र, मुंडे साहेबांच्या निधनानंतर गोपीनाथगडाची निर्मिती झाली. त्याचवेळी स्वत: पंकजांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित जाहीर केले होते, की हा गड राजकीय प्रेरणेचा असेल म्हणून. मीही त्याच कार्यक्रमात यापुढे भगवानगडावर कुठल्याही राजकीय व्यक्तीचे भाषण होणार नाही, असे स्पष्ट केले होते. तरीही पंकजांनी दसरा मेळाव्याचा हट्ट धरलाच होता. यातूनच वाद उद्भवला. आता या वादावर पडदा टाकायची इच्छा असेल तर यापुढे गडावर भाषण करणार नाही, असे घोषित करा.

गोपीनाथगडाविषयी काय म्हणाले महंत नामदेवशास्त्री... वाचा पुढील स्लाइडवर क्लिक करून....

हेही वाचा...

> EXCLUSIVE: पुन्हा पुन्हा गोपीनाथगडाचा विषय का? महंतांना विचारूनच ठरवले नाव- पंकजा मुंडे
> EXCLUSIVE: आशीर्वाद हवा असेल तर भगवानगडाच्या नादी लागू नका; नामदेव शास्त्रींचा पंकजा मुंडेंना इशारा

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...