औरंगाबाद - औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी कुटूंबियांना मदतीचा हात देण्यासाठी अभिनेता नाना पाटेकर आणि मकरंद अनासपूरे सोमवारी दुपारी शहरात दाखल झाले. संत तुकोबाराय नाट्यगृहात आर्थिक मदत देण्यासाठी आलेल्या नाना आणि मकरंदसमोर शेतक-यांना अश्रू अनावर झाले. नाना आणि मकरंद यांनी शेतकरी महिलांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घेतले. काही निरूत्तर माणसांच्या चेह-यांवरचे भाव येथे दुख:चे पाढे वाचताना दिसले.
शेतक-यांचे प्रश्न प्रचंड गंभीर आहेत, त्यामुळे दुष्काळावर कोणीही राजकारण करू नये, असे आवाहन नाना पाटेकर यांनी केले आहे. पाणीटंचाई लक्षात घेता. पाण्याचा वापर जपून करा असेही ते म्हणाले. नाना आणि मकरंद यांच्या या कार्याला लोकांची चांगलीच साथ मिळत असल्याचे दिसून येत आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करून वाचा..
युती तुटली हे सेनेला सांगायची हिंमत मी केली- खडसे यांचा गौप्यस्फोट
दुष्काळाला बारामतीकर जबाबदार: विखे-पाटलांचा पवारांना टोला
ठाण्यात महिला पोलिस कॉन्स्टेबलसोबत गैरवर्तन, वर्दी फाडली