आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nanded Bikaner Express Via Akola South Central Railway

नांदेड-बिकानेर एक्स्प्रेस अकोलामार्गे, "दमरे'विरुद्ध जनहित याचिका दाखल करणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- महत्प्रयासानंतर औरंगाबादसाठी मंजूर झालेली नांदेड-बिकानेर एक्स्प्रेस आता अकोल्याहून जाणार आहे. २८ ऑगस्ट रोजी दक्षिण मध्य रेल्वेने गाड्यांचे नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यात हा बदल करण्यात आला आहे. मराठवाड्याचा विचार करता हा मार्ग बदलला असल्याचे मराठवाडा रेल्वे प्रवासी संघटनेचे म्हणणे आहे. याबाबत खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे संघटनेचे सदस्य राजकुमार सोमाणी यांनी सांगितले.

रेल्वे अर्थसंकल्पात नांदेड-बिकानेर एक्स्प्रेसची (क्रमांक १७६२३ १७६२४) घोषणा करण्यात आली होती. नांदेड - औरंगाबाद- मनमाड- बिकानेर असा तिचा मार्ग ठरला होता. मात्र, नव्या वेळापत्रकात गाडीचा मार्ग नांदेड- पूर्णा- अकोला- सुरत- अहमदाबाद-बिकानेर असा करण्यात आला आहे. औरंगाबाद- रेनीगुंठा ही तिरुपतीसाठी नवीन रेल्वे सोडण्यात येणार आहे.

आठवड्यातून एकदा ही गाडी असेल. नवीन वेळापत्रकात या गाडीचा केवळ क्रमांक आला असून वेळापत्रक जाहीर झाले नाही. नवीन वेळापत्रकात दमरेने २६ नवीन गाड्या सुरू केल्या आहेत. यातील १४ गाड्या वळवण्यात आल्या आहेत, तर १४ गाड्या नव्याने जाहीर होणार आहेत. याशिवाय औरंगाबाद विभागातील काही गाड्यांच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे.

>नगरसोल-नरसापूर एक्स्प्रेस : सकाळी११.३० वाजता नगरसोलहून सुटून दुपारी वाजता जालन्यात पाेहोचत होती. आता दुपारी दीड वाजता पोहोचेल.

>नगरसोल-नांदेड पॅसेंजर : पहाटेसाडेपाच वाजता नगरसोलहून निघून दुपारी १.४५ वाजता नांदेडला पोहोचत होती. ती आता दुपारी ३.२० ला पोहोचेल.

>मनमाड-काचीगुडा पॅसेंजर : नगरसोलहूनसकाळी ६.३० वाजता ऐवजी वाजता सुटून सकाळी वाजता औरंगाबादला पोहोचेल.