आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेडमध्‍ये झाली दहा शेतक-यांच्‍या संसाराची राखरांगोळी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आगीतून वाचलेले उरले सुरलेले धान्‍य जमा करता शेतकरी महिला. - Divya Marathi
आगीतून वाचलेले उरले सुरलेले धान्‍य जमा करता शेतकरी महिला.
नांदेड – हिमायतनगर तालुक्‍यातील वडगाव येथे सोमवारी मध्‍यरात्री लागलेल्‍या आगीत 10 अल्‍पभूधारक शेतक-यांच्‍या संसाराची राखरांगोळी झाली. यामध्‍ये घरातील वस्‍तू, कपडे, रोख रक्‍कम, महत्‍त्‍वाचा दस्‍तऐवज, धान्‍य सर्व काही काही जळून खाक झाले. यामध्‍ये एकूण 15 लाख रुयपयांचे नुकसान झाल्‍याचा प्राथमिक अंदाज आहे.
या घटनेत गंगाधर मारोती माळसोठे, लक्ष्मण मारोती माळसोठे, हुलाजी सखाराम तुपेकर, आनंदराव सखाराम तुपेकर, सखाराम तोलाजी तुपेकर, मारोती नारायण शिंदे, बालाजी राजाराम शिंदे, राजाराम नारायण शिंदे, ग्यानबा पुंजाराम पावडे, रामेश्वर ग्यान्बाराव पावडे या शेतक-यांची घरे जळून खाक झालीत. मागील 15 दिवसांपासून पावसाने उघडीप दिली. त्‍यामुळे शेतक-यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे, अशा कठीण परिस्थितीसमोर वडगाव येथील 10 शेतक-यांची घरे पूर्णत: जळून खाक झालीत. त्‍यामुळे त्‍यांचे कुटुंब उघड्यावर आले आहे.