आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नंदी दूध प्यायल्याची अफवा; पाताळेश्वर महादेव मंदिरातील घटना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शनिवारी रात्री साडेआठ च्या सुमारास खारा कुवा परिसरातील गुजराथी हायस्कुललगत पाताळेश्वर महादेव मंदिरात नंदी दूध पीत असल्याची अफवा शहरात पसरली. त्यामुळे रात्रभर मंदिरात नागरिकांनी उत्सुकतेपोटी गर्दी केली होती.
संगीता पवार आणि कमला शर्मा या महिला नेहमीप्रमाणे रात्री दर्शनासाठी मंदिरात गेल्या. त्यांनी महादेवाला दुधाचा नैवेद्य दाखवला व दुधाची वाटी नंदीच्या समोर धरली. त्यांना वाटीतील दूध कमी झाल्याचे जाणवले. ही घटना त्यांनी इतरांना सांगितली. इतरांनीही नंदीला दूध पाजण्याचा प्रयत्न केला असता मुर्ती दूध प्राशन करत असल्याचे आढळून आल्याचा दावा करण्यात आला. रात्री उशीरापर्यंत पाच लीटर दूध नंदीने प्राशन केल्याचे भाविकांनी सांगितले.
वैज्ञानिक दृष्टीकोन तपासावा : दाभोळकर- नंदी दूध प्याला यामागील कार्यकारणभाव तपासणे म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे हे बघण्याची आवश्यकता असल्याचे मत अंधर्शद्धा निर्मूलन संघटनेचे अध्यक्ष नंरेंद्र दाभोळकर यांनी व्यक्त केले. दाभोळकर म्हणाले की, अशीच घटना बेळगाव व सिंधुदुर्ग जिल्ह्यात घडल्याचे दूरध्वनीद्वारे अनेकजणांनी सांगितले. अशावेळी प्रशासनाने अंधर्शद्धेस प्रतिबंध घालावा. अनेकदा अशा घटना घडतात. कर्नाटकात गणपती दूध पिल्याची घटना घडल्यानंतर तेथील सरकारने मंदिरांचे दरवाजे बंद केले होते.