आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Nandigram Express News In Marathi, Divyamarathi, Aurangabad

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाणी संपल्याने प्रवाशांनी ‘नंदीग्राम’ औरंगाबादेत तब्बल सव्वा तास रोखली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- डब्यांमध्ये पाणीच नसल्याने संतप्त प्रवाशांनी नंदीग्राम एक्स्प्रेस औरंगाबाद रेल्वे स्थानकावर एक तास दहा मिनिटे रोखून धरली होती. नागपूरहून मुंबईकडे जाणार्‍या गाडीत नांदेड किंवा पूर्णा येथे पाणी भरले जाते. गुरुवारी त्याकडे रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे चिडलेल्या प्रवाशांनी औरंगाबाद येताच स्टेशन मास्टर अशोक निकम यांच्याकडे जाब विचारला. त्यावर निकम यांच्याकडे समाधानकारक उत्तर नव्हते. मात्र, त्यांनी संबंधितांना निर्देश देऊन पाणी भरले. या प्रकारामुळे रात्री 9.35 वाजता निघणारी ही गाडी 10.45 वाजता रवाना झाली. प्रवासी अमोल चव्हाण यांनी सांगितले की, तक्रार करूनही पाणी भरण्यात आले नाही. मानवत रोड स्थानकावरून संदेश देण्यात आला होता.