आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खांडकेेंच्या जाचामुळे पराशर यांची आत्महत्या, नातेवाइकांचा आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कनिष्ठ लिपिक किशोर नारायण पराशर (४५, रा. उत्तरानगरी, मुकुंदवाडी) यांनी मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. शिक्षण उपसंचालक वैजनाथ खांडके यांच्या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल होऊन त्यास अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेत नातेवाइकांनी बुधवारी शवगृहासमोरच ठिय्या मांडला होता. 

एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक जाधव यांनी गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांनी दिली. 

शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कनिष्ठ लिपिक किशोर नारायण पराशर यांच्या आत्महत्येस कारणीभूत व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी नातेवाइकांनी ठिय्या दिला. 
 
बातम्या आणखी आहेत...