आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल अजूनही चॉकलेटमध्ये रमलेले : नरेंद्र मोदी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - थ्रीडी सभेच्या माध्यमातून नरेंद्र मोदींनी राहुल यांच्यावर सोमवारी हल्लाबोल केला. राहुल यांचे वय वाढले, तरी बचपना मात्र गेला नाही. त्यामुळे अजूनही ते टॉफीतच रमतात. त्या बालमनातून ते अजून बाहेर आलेच नाहीत, अशी टीका मोदी यांनी केली. प्रकाशनगर मैदानावर झालेल्या थ्रीडी सभेत लोकांनी मोदींना ऐकण्यासाठी गर्दी केली होती. थ्रीडी होलीग्राम या आधुनिक तंत्राच्या माध्यमातून पहिल्यांदाच मोदींची सभा झाली. या माध्यमातून मोदींची प्रत्यक्ष सभा ऐकल्याचे समाधान लोकांना मिळत होते.

एकाच वेळी शंभर सभा
मोदींच्या थ्रीडी होलीग्राम तंत्रज्ञानावर आधारित सभेबाबत तंत्रज्ञ प्रतीक जैन म्हणाले, गांधीनगर स्टुडिओतून ही सभा सॅटेलाइटच्या माध्यमातून प्रक्षेपित झाली. 15 राज्यांत 100 ठिकाणी ही सभा लाखो लोकांना एकाच वेळी पाहायला मिळाली.