आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकहून येणारे पाणी थांबवले; 11 मार्चला येणार नांदूर-मध्यमेश्वरमध्ये पाणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- विभागीय आयुक्तांनी चर्चा केल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील दारणा धरणातून वैजापूर, गंगापूर तालुक्यांसाठी पाणी सोडण्यात आले होते. मात्र, आताच नको म्हणून हे पाणी थांबवण्यात आले असून 11 मार्चला ते सोडले जाणार आहे. आत्ताच गरज नसल्यामुळे पाणी सोडणे थांबवण्यात आल्याचे जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी सांगितले.

नाशिक जिल्ह्यातील विविध धरणांतून दोन रोटेशन सोडण्यात येतात. पहिल्या रोटेशनचे दीड टीएमसी पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. त्यानुसार दारणातून 27 फेब्रुवारीलाच पाणी सोडण्यात आले. मात्र औरंगाबादच्या जिल्हाधिकाºयांनी वेळापत्रक तयार करून हे पाणी 11 किंवा फार फार तर 12 मार्चला सोडावे, अशी विनंती करण्यात आली असल्याचे विक्रमकुमार यांनी सांगितले.

असे आहे औरंगाबाद जिल्ह्यातील चित्र
>नाथसागरातील जलसाठा- 3 टक्के
>दररोज 1.9 दशलक्ष घनमीटर इतके पाणी उपसले जाते.
>एकूण पाण्याच्या अर्धा टक्का पाण्याचे बाष्पीभवन होते.
>ग्रामीण भागात 260 टँकर सुरू आहेत.

थकीत 12 कोटी मिळाले
रोजगार हमी योजनेची देयके अदा करण्यासाठी शासनाकडून जिल्हा प्रशासनाला नुकतेच 12 कोटी रुपये मिळाले आहेत. शासनाकडे 27 कोटी रुपये थकले होते. गेल्या महिन्यात 5 कोटी मिळाले होते. काल 12 कोटी मिळाले असून महिनाअखेर उर्वरित 10 कोटी रुपये मिळतील, असा विश्वास जिल्हाधिकाºयांनी व्यक्त केला आहे.