आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...तर बालकाश्रमाची मान्यता रद्द

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - जय आनंद निराश्रित बालकार्शमातील घडलेला प्रकार गंभीर आहे. केवळ कर्मचार्‍यांवर कारवाईच करण्यापर्यंत न थांबता, या प्रकरणाची सखोल चौकशी करा. त्यात संस्था दोषी आढळल्यास थेट मान्यताच रद्द करा, असे आदेश जिल्हाधिकारी विलास पाटील यांनी जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी दिलीप हिवराळे यांना दिले.

पेठरोडवरील तवली फाटा येथे असलेल्या या बालकाश्रमातील बालिकांचे शोषण होत असल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. त्यातील 34 पैकी सहा मुलींनी आर्शमातील पाच कर्मचारी असभ्य वर्तन करत असल्याची तक्रार केली. त्याची गंभीर दखल घेत महिला व बालकल्याण विभागाने संबंधित मुलींना अभिरक्षणगृहात हलविले. त्यानंतर पाचपैकी चार जणांविरुद्ध पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवीत त्यांना अटकही करण्यात आली. मात्र, केवळ अटकेपुरतीच र्मयादित ही बाब नसल्याने जिल्हाधिकार्‍यांनीही त्याबाबत वैयक्तिक लक्ष घालत त्यावर महिला व बालकल्याण विभागास अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. त्यात शासनाच्या अटी- शर्तींचे उल्लंघन संस्थेने केले अथवा नाही, याच्या योग्य तपासणी करण्याच्याही सूचना दिल्या आहेत.

आश्रमासाठी शासन जागा देणार
आश्रम संपूर्णपणे खासगी तत्त्वावर सुरू असल्याने त्यावर शासनाचे नियंत्रण नाही. त्यामुळेच कदाचित हे प्रकार घडत आहेत. त्यावर शासनाचेच नियंत्रण असावे, यासाठी आता निरार्शित मुलांच्या आश्रमासाठी जागा देण्याचे आश्वासन जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत. त्यासाठी महिला व बालकल्याण अधिकार्‍यांना प्रस्ताव सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले.