आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंदिरानगर बोगदा वाहतुकीस खुला करण्यासाठी आज सर्वेक्षण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदिरानगर बाेगद्याप्रश्नी पाेलिस अायुक्त एस. जगन्नाथन यांच्याशी चर्चा करताना महापौर अशोक मुर्तडक. समवेत मनसेचे नगरसेवक. - Divya Marathi
इंदिरानगर बाेगद्याप्रश्नी पाेलिस अायुक्त एस. जगन्नाथन यांच्याशी चर्चा करताना महापौर अशोक मुर्तडक. समवेत मनसेचे नगरसेवक.
नाशिक -इंदिरानगर परिसरातील हजाराे रहिवासी नगरसेवकांच्या विराेधानंतरही पाेलिस यंत्रणेकडून येथील बाेगदा खुला केला जात नसल्याने खुद्द महापाैर अशाेक मुर्तडक यांच्या नेतृत्वाखाली नगरसेविका दीपाली कुलकर्णी, यशवंत निकुळे यांनी गुरुवारी पाेलिस अायुक्तांची भेट घेतली. पाेलिसांकडून रहिवाशांची मते विचारात घेता अचानक बाेगदा बंद केल्याने माेठ्या प्रमाणात रहिवाशांना मनस्ताप सहन करावा लागत असून, ताे त्वरित वाहतुकीला खुला करण्याची सूचना केली. मात्र, अायुक्त एस. जगन्नाथन यांनी महामार्ग प्राधिकरणाच्या सूचनेनुसार अाठवडाभर बाेगदा बंदच ठेवावा लागणार असून, सर्वेक्षणाअंती फेरविचार केला जाईल, यासाठी वाहनचालकांकडून सात प्रश्नांचा अर्ज भरून घेतला जात अाहे, असे सांगितले.
वाहतूक पाेलिसांमार्फत वाहनचालकांचे अर्ज भरून घेतल्यानंतर त्यात किमान ४० टक्के लाेकांनी जरी त्यास विराेध दर्शविला तरी तत्काळ हा बाेगदा खुला करण्यात येईल, असे अाश्वासन जगन्नाथन यांनी महापाैर पदाधिकाऱ्यांना िदले. यावरून अाणखी किमान चार दिवस तरी बाेगदा बंदच राहणार अाहे. पाेलिस अायुक्तांच्या दालनात झालेल्या बैठकीत नगरसेविका दीपाली कुलकर्णी यशवंत निकुळे यांनी बोगदा बंद झाल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला,

अर्ज भरून घेणारे वाहतूक पाेलिस गायब
इंदिरानगरयेथील बाेगदा सुरू करायचा की कायमस्वरूपी वाहतुकीसाठी बंद ठेवायचा, यासाठी लाेकप्रतिनिधी रहिवाशांच्या विराेधानंतर त्यांचे मत जाणून घेण्यासाठी पाेलिसांनी सर्वेक्षण सुरू केल्याचे पाेलिस अायुक्तांनी महापाैर लेाकप्रतिनिधींना सांगितले. प्रत्यक्षात महापाैर पदाधिकाऱ्यांनी बाेगद्याच्या ठिकाणी भेट दिली असता, एकही वाहतूक पाेलिस वाहनचालकांकडून अर्ज भरून घेताना िदसून अाला नाही. त्यापाठाेपाठ दुपारी वाजता, सायंकाळी वाजेपर्यंत अर्ज भरून घेणारे कर्मचारी नजरेस पडले नाहीत. तर, वाहतूक पाेलिसांनी सकाळी बाेगद्याजवळून मुंबईकडे जाणाऱ्या बाहेरील कारचालकांना थांबवून त्यांच्याकडून अर्ज भरून घेतल्याचे परिसरातील रहिवासी सांगत हाेते. त्याएेवजी पाेलिसांनी या ठिकाणी अधिकृतपणे टेबल टाकून वाहनधारकांना माहितीसाठी फलक लावून अर्ज भरून घेतले पाहिजे. अथवा, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जनता दरबार भरवून जनमत घेतले पाहिजे, अशी मागणीही वाहनधारक करत अाहेत.

बोगद्याबाबत पाेलिसांची भूमिका संशयास्पद
बंदबोगदा वाहतुकीसाठी चार दिवस बंद राहणार असल्याचे सांगत ताे सुरू करण्याबाबत पाेलिस अायुक्तांकडून चालढकल करण्यात अाली. यावर लाेकप्रतिनिधींनी िसंहस्थ, गुन्हेगारी नियंत्रणाला प्राधान्य देता भलत्याच विषयाला पाेलिसांकडून प्राधान्य िदले जात असल्याने पाेलिसांच्या भूमिकेविषयीच संशय व्यक्त करण्यात अाला.

पाेलिस अर्जाच्या अधिकृतपणावर प्रश्न
वाहतूकपाेलिसांकडून जाे अर्ज भरून घेतला जात अाहे, त्या अर्जावर पाेलिस अायुक्त अथवा वाहतूक शाखेचा शिक्का नाही. त्यावर अनुक्रमांक, लेटरहेड असा उल्लेख नसल्याने हा साधा अर्ज अधिकृत मानून खराेखरच सर्वेक्षणातून प्राप्त हाेणाऱ्या कलाच्या अनुषंगाने निर्णय हेाईल का, असे प्रश्न उपस्थित हाेत अाहेत.
वाहनचालकांनी पाठवावेत ‘दिव्य मराठी’कडेही अर्ज
इंदिरानगर बाेगदा वाहतुकीस खुला करण्याचा निर्णय घेण्यासाठी वाहतूक पाेलिसांकडून वाहनचालकांचे अर्ज भरून घेण्यात येत अाहेत. हा अर्ज वाहनचालकांनी संबंधित यंत्रणेकडे भरून देण्याबराेबरच या भरलेल्या अर्जाचा माेबाइलवर फाेटाे काढून ताे ‘िदव्य मराठी’कडे ९०२८७०१९७३९८२२११४४३८ याव्हाॅट्सअॅप क्रमांकावर पाठवावा.
वाहनाचा प्रकार - माेटारसायकल,कार, टेम्पाे, बस, ट्रक, रिक्षा, जीप
वाहनाचा रजि. नंबर -
वाहनचालकांकडून हा अर्ज भरून घेणार
१)इंिदरानगर जाॅगिंग ट्रॅक, राजमाता येथील उड्डाणपुलाखालील अंडरपास (बाेगदा) वाहतुकीच्या दृष्टीने बंद केले, हे याेग्य अाहे काय?
१.-हाेय २.- नाही
२)इंिदरानगर येथील उड्डाणपुलाखालील अंडरपास (बाेगदा) वाहतुकीसाठी चालू ठेवल्यास अपघाताचे प्रमाण वाढते, हे खरे अाहे काय?
१.-हाेय २.- नाही
३)बाेगदा वाहतुकीस बंद करून इंदिरानगरकडे जाण्यासाठी पीलर क्र. १७१ येथून वळण घेऊन जाण्यास याेग्य अाहे अगर कसे?
१.-हाेय २.- नाही
४)लेखानगर येथून उड्डाणपुलाखालून वळण घेऊन राजमाताकडे जाण्यास रस्ता साेयीस्कर अाहे काय?
१.-हाेय २.- नाही
५)उड्डाणपुलाखालील अंडरपास हा वाहतुकीस कायमस्वरूपी बंद ठेवल्यास वाहतूक काेंडी सुटण्यास मदत हाेईल हे बराेबर अाहे काय?
१.-हाेय २.- नाही
६)उड्डाणपुलाखालील अंडरपास येथील सततच्या वाहतूक काेंडीत जास्त वेळ वाहन उभे करून राहण्यापेक्षा वळण घेऊन जाणे याेग्य वाटते काय?
१.-हाेय २.- नाही
७)उड्डाणपुलाखालील अंडरपास बंद ठेवल्यास अपघाताचे प्रमाण कमी हाेऊन वाहतूक काेंडी हाेत नाही हे बराेबर अाहे काय?
१.-हाेय २.- नाही
बातम्या आणखी आहेत...