आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अटीतटीच्या झुंजींनी रंगले नाशिक कबड्डी लीगचे सामने

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - स्वर्गीय गोपीनाथ मुंडे क्रीडानगरीत सुरू असलेल्या के.व्ही.एन. नाईक नाशिक कबड्डी प्रीमियर लीगच्या तिसऱ्या दिवशी अत्यंत चुरशीचे सामने झाले. त्यातील ए.बी.सी. टायगर्स विरुद्ध जयभद्रा रायडर्स हा सामना बराेबरीत सुटला. तर, अन्य सामन्यांमध्ये सर्वज्ञ रायडर्स अाणि कपालेश्वर लायन्सने बाजी मारली.
डाेंगरे वसतिगृह मैदानावर सुरू असलेल्या या कबड्डी सामन्यांना प्रेक्षकांकडूनही प्रचंड प्रतिसाद लाभत अाहे. त्यामुळे मंगळवारपासूनचे सामने अधिकच रंगतदार ठरत अाहेत. प्रेक्षकांकडून मैदानावर मिळणाऱ्या प्राेत्साहनामुळे खेळाडूंचा खेळदेखील बहरत असल्याचा प्रत्यय मंगळवारच्या सामन्यांनी दिला.

कपालेश्वर लायन्सचा सहज विजय
कपालेश्वर लायन्सने कन्हैया चॅलेंजर्सवर सामन्याच्या सुरुवातीपासूनच वर्चस्व ठेवत ३१ विरुद्ध १४ असा १७ गुणांनी पराभव करत स्पर्धेतील सलग दुसरा विजय संपादन केला. कपालेश्वर लायन्सच्या मोहसीन पठाण, सुलतान डांगे यांनी खोलवर चढाया करत गुण मिळविण्याचा सपाटा चालू केला. मध्यंतरापर्यंत कपालेश्वर लायन्स कडे १४ विरुद्ध अशी गुणांची भक्कम आघाडी घेतली. मध्यंतरानंतर निवृत्ती फड, राकेश चौधरी, सुरेश बोडके, यांच्या अभेद्य संरक्षानाने कन्हैय्या चालेन्जर्सच्या खेळाडूंचे काहीच चालू दिले नाही. कन्हैया चॅलेन्जर्सला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यातील उत्कृष्ट चढाई कपालेश्वर लायन्सचा मोहसीन कुरेशीने, तर उत्कृष्ट पकड कपालेश्वर लायन्सच्या निवृत्ती फडने पटकावले. या सामन्याचे पारितोषिक वितरण समारंभ श्रीराम कातकाडे, सुहास आव्हाड, उत्तम ठाकुर, राहुल दराडे यांच्या हस्ते झाले.

कबड्डी लीगच्या तिसऱ्या सामन्यात कपालेश्वर लायन्सने दमदार खेळाचे दर्शन घडवत बाबाज फायटर्सवर गुणांच्या फरकासह मात केली. कपालेश्वर लायन्सने सामन्याअखेर ३६ गुण मिळवले तर बाबाज फायटर्सला २७ पर्यंतच मजल मारता अाली. या सामन्यात कपालेश्वरच्या वसीम पठाणला सर्वाेत्कृष्ट पकड, तर रवींद्र जगतापला सर्वाेत्कृष्ट चढाईचा पुरस्कार प्रदान करण्यात अाला.

शेवटच्या क्षणापर्यंत सामना रंगतदार
ए.बी.सी. टायगर्स विरुद्ध जयभद्रा रायडर्स यांच्यादरम्यान झालेला सामना शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठावर्धक ठरला. जयभद्रा रायडर्सचा राकेश खैरनारने अष्टपैलू खेळाच्या जोरावर मध्यंतरापर्यंत २१ विरुद्ध १३ अशी गुणांची भक्कम आघाडी घेतली होती. मध्यंतरानंतर विक्रांत मांगडे, अझहर सय्यद, अमरुद्दीन सय्यद, निवृत्ती फड यांच्या सांघिक खेळाच्या जोरावर सामन्यामध्ये पुन्हा रंगत चढली. सामना ३२/३२ गुणांवर बरोबरीत सुटला. या सामन्यातील उत्कृष्ट चढाईसाठी ए. बी. सी. टायगर्सचा दादा आव्हाडने, तर उत्कृष्ट पकड ए.बी.सी. टायगर्सचा अमरुद्दिन सय्यद याने किताब पटकावला. सामन्याचे पारितोषिक वितरण जयंत महाजन, जयवंत साबळे, मिलिंद शिंपी, किरण फड यांच्या हस्ते झाले.
सर्वज्ञ रायडर्सची कन्हैया चॅलेंजर्सवर मात
सर्वज्ञ रायडर्सने कन्हैया चॅलेंजर्सवर ३३ विरुद्ध २७ असा गुणांनी पराभव करून स्पर्धेतील दुसरा विजय संपादन केला. तर, कन्हैया चॅलेंजर्सला सलग तिसऱ्याही दिवशी पराभवाला सामोरे जावे लागले. सर्वज्ञ रायडर्सच्या संजय महाजन, अझीम सय्यद, लाडला मन्सुरी, शुभम बारमाटे, सचिन शिंदे, आज चांगला सूर सापडल्याने पहिल्यापासूनच सामन्यावर सर्वज्ञ रायडर्सने पकड ठेवली होती. ती सामन्यावरची पकड शेवटपर्यंत ठेवत विजय संपादन केला आपले स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले.

कन्हैया चॅलेंजर्सचे शंकर गदईने एकाएकी झुंज दिली. सामन्यातील उत्कृष्ट चढाईचा बहुमान कन्हैया चॅलेंजर्सचा विशाल वाजे, तर उत्कृष्ट पकडीचा मानकरी सर्वज्ञ रायडर्सचा सचिन शिंदे याने पटकावला. या सामन्याचे पारितोषिक वितरण अशोक बिल्डकॉनचे संचालक अशोक कटारिया, नगरसेवक उत्तमराव दोंदे, बाळासाहेब पालवे, डॉ. श्रद्धा लुनिया, राज्य कबड्डी संघटनेचे सहसचिव मुजफ्फर आली सय्यद, जळगाव कबड्डी असोसिएशनचे श्याम कोकटा, हेमंत धात्रक, प्रकाश घुगे, माणिक सोनवणे, संपत वाघ, भगवान सानप, हेमंत नाईक यांच्या हस्ते झाला.
बातम्या आणखी आहेत...