आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानापमानाचा ‘काला’, प्रशासनाने फोडली नाथांची दहीहंडी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैठण - संत एकनाथांच्या वंशजांवरून चाललेल्या मानापमान नाट्यामुळे यंदाच्या नाथषष्ठी सांगताप्रसंगी बुधवारी प्रशासनालाच पुढाकार घेऊन दहीहंडी फोडावी लागली. पाच तास हा घोळ चालल्यामुळे वारकºयांनी मात्र दहीहंडी फुटण्याआधीच काढता पाय घेतला.
यंदा दहीहंडी फोडण्याचा मान रावसाहेब महाराज गोसावी यांना होता. मात्र, रघुनाथबुवांची दिंडी नाथ समाधी मंदिरात आधीच आल्याने रावसाहेब महाराजांनी दहीहंडी फोडण्यास नकार दिला. प्रशासनाने विनंती केली तरी ते ठाम राहिले. अखेर प्रशासनानतर्फे दहीहंडी फोडण्यात येत असल्याचे तहसीलदार राजीव शिंदे यांनी जाहीर केले. त्यानंतर सूर्यास्तानंतर रात्री 8 वाजेदरम्यान दहीहंडी फोडण्यात आली.
मुहूर्त निघून गेल्याने पाच तासांपासून ताटकळलेल्या मंडप, मंदिर व मंदिराबाहेरील वारकºयांनी घोषणा सुरू केल्या. काही महिलांनी सोबत आणलेला काला दहीहंडी फुटण्यापूर्वीच वाटून टाकला. काही तरुणांनी मनोरे रचून आणि नारळ फेकून दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी हस्तक्षेप करत शांततेचे आवाहन केले. या वेळी अप्पर जिल्हाधिकारी किसनराव लवांदे, तहसीलदार राजीव शिंदे यांनी मध्यस्थी केली. मागील काही वर्षांपासून पांडव विरुद्ध गोसावी यांचा नाथवंशजाच्या मुद्द्यावरून वाद होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच रघुनाथबुवा यांना नाथवंशज म्हणून जाहीर केले आहे.