आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National Assessment And Accreditation Council (NAAC) In Aurangabad University

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘नॅक’समोर 40 विभागांचे प्रेझेंटेशन; उस्मानाबाद उपकेंद्रालाही दिली भेट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- ‘नॅक’ उच्चस्तरीय मूल्यांकन समितीने दोन दिवसांत सुमारे 40 विभागांची पाहणी तसेच मूल्यांकन केले. यानिमित्ताने प्रत्येक विभागाने प्रभावी प्रेझेंटेशनद्वारे विभागातील सर्वोत्तम सादर करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. त्यातही विद्यापीठातील ‘अ‍ॅसेट’ समजण्यात येणाºया विज्ञान विभागाचे प्रेझेंटेशन सर्व दृष्टीने प्रभावी झाल्याची चर्चा असून समितीनेही फारशा शंका-कुशंका घेतल्या नसल्याचे सांगण्यात आले.

नॅक समितीने मंगळवारपासून विद्यापीठातील विविध विभागांची पाहणी करण्यास सुरुवात केली. पहिल्या व दुसºया दिवशी समितीने सुमारे 40 विभागांची पाहणी केली. त्यासाठी समिती सदस्यांचे तीन गट पाडण्यात आले होते. पहिल्या दिवशी सांख्यिकीशास्त्र, पर्यावरणशास्त्र, गणित, इंग्रजी, हिंदी, मराठी, व्यवस्थापनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन आदी विभागांची, तर दुसºया दिवशी म्हणजेच बुधवारी पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, रसायन तंत्रशास्त्र, जीवरसायनशास्त्र आदी विभागांची समितीने पाहणी केली. या समितीमध्ये अध्यक्ष प्रा. पी. एस. झकारियाज, सचिव डॉ. जगन्नाथ पाटील, डॉ. डी. चंद्रशेखर रेड्डी, डॉ. ममता सत्पथी, डॉ. मेहराजुद्दीन, प्रा. बी. माटे, प्रा. एम. सी. शर्मा, प्रा. एस. मोहनराज, प्रा. एम. ए. सुधीर यांचा समावेश आहे.

‘पीपीपी’द्वारे विभागांची बलस्थाने सादर
विद्यापीठाच्या प्रत्येक विभागाने समितीसमोर पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे सादरीकरण केले. यामध्ये विभागाची सर्व बलस्थाने, वेगवेगळे प्रकल्प, संशोधन, विविध उपक्रम, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील रिसर्च पेपर, भविष्यातील योजना, प्रकाशित साहित्य, विद्यार्थ्यांचे अनेकविध प्रकारच्या परीक्षांमधील यश अशी सगळी बलस्थाने प्रत्येक विभागाने ‘नॅक’समोर मांडली. विभागामध्ये उपलब्ध असलेल्या सोयी-सुविधाही मांडण्याचा प्रयत्न झाला. विशेष म्हणजे विभागामध्ये ज्या कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत आणि त्यांची नोंद करण्यात आली होती, त्याबाबतची सविस्तर माहिती कटाक्षाने देण्यात आल्याचेही काही प्राध्यापकांनी सांगितले. सर्व प्रकारची सविस्तर माहिती मिळाल्यानंतर समिती सदस्य काही शंका असल्या तरच प्रश्न उपस्थित
करत होते, अन्यथा सर्व काही समजून घेण्याच्या मन:स्थितीत होते, असेही काहींनी सांगितले.

आज विद्यार्थी कल्याण विभागाला भेट
समितीतील एका गटाने उस्मानाबाद उपकेंद्राला भेट दिली. बुधवारी सकाळी हा गट उपकेंद्राकडे रवाना झाला आणि रात्रीपर्यंत परतल्याचेही सांगण्यात आले. गुरुवारी विद्यार्थी कल्याण विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, अ‍ॅकॅडमिक स्टाफ कॉलेजला भेट देणार असल्याचे समजते.

संगीत-नाट्याचा कार्यक्रम
नॅक समितीसाठी बुधवारी विद्यापीठाच्या नाट्यगृहात खास संगीत-नाट्याचा कार्यक्रम सादर करण्यात आला. यात विद्यापीठातील विविध विद्यार्थ्यांनी विभिन्न अदाकारी पेश केली.