आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठ जानेवारीला राष्ट्रीय बँकांचा देशव्यापी संप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (एसबीआय) सहयोगी बँकांच्या विलीनीकरणास ऑल इंडिया बँक एम्प्लाॅइज असोसिएशनने (एआयबीईए) विरोध केला आहे. आंदोलनाचा भाग म्हणून आठ जानेवारीला देशातील पाच लाख सदस्य एक दिवसाच्या लाक्षणिक संपावर जाणार असल्याची माहिती देविदास तुळजापूरकर यांनी दिली. स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ पतियाळा, स्टेट बँक ऑफ बिकानेर आणि जयपूर आणि स्टेट बँक ऑफ त्रावणकोर आदी बँकांचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलीनीकरण करण्याचा घाट घातला जात आहे.
या निर्णयाच्या विरोधात कर्मचारी, अधिकारी संघटनेने विरोधी भूमिका घेतली आहे. सर्व बँका राष्ट्रीयीकृत बँका असून त्यांच्या नफ्यामध्येही तूट आलेली नाही. त्यामुळे विलीनीकरण करण्यात येऊ नये यासाठी संप पुकारला आहे. सिडको टाऊन सेंटर येथील स्टेट बँक ऑफ हैदराबादसमोर धरणे आणि निषेध सभा होणार आहे. संपात सहभागी होण्याचे आवाहन रवी धामणगावकर, जगदीश भावठाणकर, हेमंत जामखेडकर यांनी केले आहे.
बातम्या आणखी आहेत...