आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंजूर पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईना !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर- मागील वर्षीच्या खरीप हंगामातील पीक विमा शेतकऱ्यांना मंजूर झाला आहे. त्यामुळे खरीप हंगामाच्या ऐन तोंडावरच ही नुकसान भरपाईची रक्कम मिळणार असल्याने पेरणीसाठी शेतकऱ्यांकडे पैसा उपलब्ध होणार होता; परंतु जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कृषी विभाग आणि महसूल प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे नागमठाणच्या शेतकऱ्यांच्या खात्यात अद्यापही पैसे जमा झाले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पडण्याऐवजी निराशच पडल्याचे पाहावयास मिळत आहे.

मागील तीन-चार वर्षांपासून सतत कोणत्या ना कोणत्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यातच मागील वर्षी तालुक्यात अपुरा पाऊस पडला होता. खरिपात पेरणी लागवड केलेली पिके शेतकऱ्यांच्या हातातून गेली होती. यामुळे शेतकऱ्यांना चांगलेच आर्थिक नुकसान सहन करावे लागले. दरवर्षी होणारे नुकसान पाहता शेतकऱ्यंानी पीकविमा उतरवण्याचे मनावर घेतले. त्यानुसार वैजापूर तालुक्यातील नागमठाण या सर्कलमध्ये हजार ९९४ शेतकऱ्यांना कोटी लाख ८७ हजार १७० रुपयांचा पीक विमा मंजूर झाला आहे. विशेषत: नागमठाण परिसरातील हजार ९९४ महालगाव परिसरातील १२ हजार १२० शेतकऱ्यांनी पीकविमा काढला होता.

त्रिकुटाच्यावादामुळे शेतकरी वंचित : महसूलविभाग, कृषी विभाग आणि जि.म.स. बँक शाखा, लाडगाव यांच्या गलथान कारभारामुळे आता शेतकरी अडचणीत सापडला आहे. नागमठाण सर्कलसाठी सगळ्याच पिकांना विमा मंजूर झाला आहे. बँकेने मात्र लाडगाव सर्कलमधूनच शेतकऱ्यांनी विमा भरला. नागमठाणमधून आमच्याकडे विमा भरला नाही, अशी हुशारी केली, तर शेतकऱ्यांनी नागमठाण सर्कलसाठी आपल्याच बँकेतून विमा भरला त्यांचा आपल्याकडे भरलेला फॉर्मही आहे, असा दावा कृषी विभागाने केला आहे. या सगळ्यांच्या वादात शेतकरी मात्र पूर्ण खचून गेला आहे. आधीच दुष्काळ, त्यात कर्ज काढून भरलेला विमा आणि वाट्याला आलेल्या निराशेने शेतकऱ्यांमागचे संकट काही कमी होताना दिसत नाही. बँकेचे कर्मचारी यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
आम्हाला नागमठाणमध्ये बसवा
सर्कलमधील शेतकऱ्यांचेनुकसान झाले ते बँक शाखा अधिकारी काकासाहेब जाधवांच्या चुकीमुळे झाले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करा. फॉर्म भरला त्या वेळेस नागमठाण सर्कल म्हणूनच भरला.
- धनंजय धौडे, शेतकरीनेते, वैजापूर.

आमची काही चूक नाही
आम्ही विमा भरून घेतो. त्या वेळी शाखेनुसार माहिती पाठवतो. आलेला पैसा शेतकऱ्यांनी घेऊन टाकणे हा नियम जिल्हा बँकेचा असतो. लोकांनी त्याच वेळी विचार करायचा आपण कुठल्या शाखेतून पीक विमा भरायचा तो.
- काकासाहेब जाधव, शाखाधिकारी,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, लाडगाव.