आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Native Thinker Support To Subhash Lomte, Divya Marathi

औरंगाबाद शहरातील विचारवंतांचा लोमटेंना पाठिंबा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी शासन प्रशासन व्यवस्थेला भ्रष्टाचार, झुंडशाही व गुन्हेगारीचे वळण दिले असून ही कोंडी फोडण्यासाठी सर्वसामान्य माणसांनीच पुढाकार घेण्याची गरज असल्याचे सांगत शहरातील विचारवंतांनी (थिंक टँक) शुक्रवारी आम आदमी पक्षाचे उमेदवार सुभाष लोमटे यांना पाठिंबा दिला आहे.
प्रा. दिनकर बोरीकर, प्रा. अजित दळवी, अँड. अरुण कापडिया, प्रा. प्रताप बोराडे, प्रा. दत्ता भगत, बाबा भांड, न्या. प्रकाश परांजपे, डॉ. भालचंद्र कांगो, उद्धव भवलकर, अँड. उदय बोपशेट्टी, अँड. विष्णू ढोबळे, अनंत आचार्य, मंगल खिंवसरा, डॉ. सुनीती धारवाडकर, सुलभा खंदारे, प्रा. विजय दिवाण, अरविंद शहा, सुजाता कांगो, अजमल खान, डॉ. आनंद निकाळजे, डॉ. अर्चना सारडा या शहरातील मान्यवरांनी एक निवेदन प्रसिद्धीस देत आज लोमटे यांना पाठिंबा जाहीर केला. या पत्रात त्यांनी खासदार कसा नसावा व कसा असावा, या मुद्दय़ांचा उहापोह केला आहे.
कसा नसावा
  • भ्रष्ट नसावा, विकासाच्या नावावर लोकांचे शोषण करणारा नसावा.
  • संसदेत कोणतीही उल्लेखनीय कामगिरी न करता केवळ स्थानिक राजकारणात गुंतून पडणारा व अनिष्ट हितसंबंधांपोटी शहरातील सार्वजनिक सेवा-सुविधांचा बळी देणारा नसावा.
  • लोकांचे जगण्याचे प्रश्न सोडून जातीय व धार्मिक भावनांचे भांडवल करून स्वत:ची राजकीय पोळी भाजून घेणारा नसावा.
असा असावा
  • सर्व प्रकारच्या भ्रष्टाचाराला कडवा विरोध करणारा असावा.
  • जाती व धर्माचे राजकारण न करणारा, विकासाबाबत व्यापक दृष्टिकोन असणारा असावा.
  • कोणाच्याही एकाधिकारशाहीऐवजी सर्वसमावेशक लोकशाहीवर श्रद्धा असणारा असावा.