आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवजीवन घोटाळ्यातील कार खरेदीचा प्रयत्न, 11 जणांना अटक

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - नवजीवन लाइफ इन्शुरन्स घोटाळ्यातील पोलिसांनी जप्त केलेल्या कार खरेदीचा प्रयत्न करणा-या 11 जणांना आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी दुपारी अटक केली.
या घोटाळ्यातील जप्त केलेल्या कार आयुक्तालयाच्या आवारात उभ्या आहेत. एका दलालासह 11 जण कार खरेदी करण्यासाठी आयुक्तालयात गेले होते. कारचे फोटो काढून किंमत निश्चित करण्यात येणार होती. ही बाब पोलिसांच्या निदर्शनास आली. त्यांनी चौकशी केली असता प्रकरण उजेडात आले.
या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार विष्णू भागवतकडून 28 इंडिका कार जप्त केलेल्या आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतर या कार विकायच्या आहेत, असे भागवतने वैजापूर येथील नरेंद्र दत्तात्रय मुळे याने सांगितले. दरम्यान अटक केलेल्या नरेशने सांगितले की, आपण गाड्या पाहण्यासाठी गेलो होतो तेव्हा पोलिसांनी बोलावून अटक केली. सायंकाळी त्या सर्वांना न्यायालयात हजर राहाण्याची नोटीस बजावून सोडण्यात आले. न्यायालयाचे आदेश नसताना खरेदी आणि विक्रीचा व्यवहार करत असल्याचे लक्षात येताच उपनिरीक्षक विश्वास पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून 11 जणांविरुद्ध गुन्हा नोंद करून त्यांना अटक करण्यात आली आहे.