आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : नवरात्रोत्सवाची धूम : चालो बेना गरबा रमवा चालाँ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवरात्रोत्सवाचे राहिलेले पाच-सहा दिवस हा रंग असाच चढत जाणार आहे. कॉलेज आणि कामाहून थकून आल्यानंतरदेखील मध्यरात्रीपर्यंत जल्लोष होतो तो केवळ नवरात्रातच. वर्षभरासाठी रिचार्ज करणार्‍या या महोत्सवाला तोड नाही, असे तरुणाईचे मत आहे.

शहरातील यंगस्टर मंडळी केवळ जल्लोष आणि मस्ती-मजा करण्यात पुढे नाही, तर अनेक मुली पहाटे उठून कर्णपुर्‍याच्या देवीच्या दर्शनासाठी रांगा लावत आहेत. अनेकांनी नवरात्रीचे नऊ दिवस उपवास केले आहेत, तर काही तरुणांच्या ग्रुपने शहरातील कर्तबगार महिलांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्याचे ठरवले आहे. प्रोझोन, छत्रपती कॉलेज, एसएफएस मैदान, टीव्ही सेंटर, बाबा पेट्रोल पंप यासह 25 ठिकाणी गरबा रास दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

अनेकांनी दांडियात आपल्याला चांगले नाचता यावे यासाठी महिनाभर अगोदरच डान्स क्लासेसमध्ये जाऊन खास प्रशिक्षण घेतले. या वर्षी क्रॉस लाइन दांडिया, पाथिया, सिंगल छकडी, डबल छकडी, वेस्टर्न दांडिया खेळण्याकडे तरुणाईचा कल आहे. आकर्षक वेशभूषा आणि झगमगाट असलेल्या वातावरणात फोटोसेशनची हौसदेखील अनेक ग्रुप पूर्ण करतात.


पुढील स्लाइडमध्ये, राज्यातील विविध शहरांमधील रास- दांडिया...