आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवरात्रोत्सवासाठी मंदिरात बसवले सीसीटीव्ही कॅमेरे, बंगाली समाजाचा उत्सवही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- गुरुवारपासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत असून शहरातील देवींच्या मंदिरांत तयारी पूर्ण झाली आहे. कर्णपुरादेवी मंदिरात सकाळी ४ वाजेपासून भाविकांची गर्दी होते. यासाठी सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे. यंदा प्रत्येक मंदिरात नागरिकांची सुरक्षा लक्षात घेऊन सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. एन-९ येथील रेणुकामाता मंदिर, कोकणवाडी आणि बीड बायपास येथील रेणुकामाता मंदिर, मुकुंदवाडीतील दुर्गामाता मंदिर दुर्गोत्सवासाठी सज्ज झाले आहेत. याशिवाय पानदरिबा येथील बंगाली समाजाचा उत्सवही सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.
मागील वर्षी कर्णपुरा येथील तुळजाभवानी मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येत होते. मात्र, यंदा यात्रेच्या परिसरात ठिकठिकाणी कॅमेरे लावण्यात आले आहेत. नागरिकांना यात्रेचा आनंद घेता यावा, महिला-तरुणींना सुरक्षितता वाटावी, या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. शहरातील विविध ठिकाणी दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे. सिनेअभिनेत्री, कलावंत यांच्या हजेरीने उत्साह वाढवण्याचा प्रयत्न दांडिया मंडळ करत आहे. बंगाली समाजात दुर्गोत्सवाचे विशेष महत्त्व असल्याने दुर्गास्थापनेचा मुहूर्त विशेष लक्षणीय ठरतो. घराघरांतून होणारी घटस्थापना समृद्धी आणि मांगल्य घेऊन येणारी आहे. भक्तगण नऊ दिवस उपवास करून देवीमाहात्म्य पठण, दुर्गासप्तशती, श्रीस्तोत्राचे पठण करतात. नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी वेगळ्या रंगांची वस्त्रे परिधान करून महिला देवीची आराधना करतात.