आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरात्रोत्सवात अत्याचार, भ्रूणहत्या रोखण्याचा संदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शिवाजीनगर परिसरातील लक्ष्मीनगर येथील लक्ष्मीमाता महिला ग्रुप गेल्या आठ वर्षांपासून नवरात्रोत्सवात सामाजिक उपक्रम राबवत आहे. समाजातील अनिष्ट रूढी, परंपरा, अन्याय, अत्याचार, स्त्री भ्रूणहत्या, पर्यावरणाविषयी जनजागृती करत आहे.
लक्ष्मीमाता महिला ग्रुपच्या सदस्या नवरात्रोत्सवात सजीव देखाव्यातून झाडे लावा, झाडे जगवा, साफसफाई, स्त्री भ्रूणहत्या, अन्यायाविरुद्ध मार्गदर्शन करीत आहे. दरवर्षी नवरात्र उत्सवात सामाजिक उपक्रम राबवण्यावर भर दिला जातो. यंदा शारदोत्सवाचे नववे वर्षे असून देवीच्या विविध रूपांचा सजीव देखावा केला आहे. समाजात चालू असलेल्या अनिष्ट परंपरा मोडीत काढून हर्ष, उल्हासाचे वातावरण निर्माण व्हावे, हा या मागचा उद्देश आहे. यासाठी सजीव देखाव्यात देवीच्या रूपात ऋती ध्रुपद हिच्या हातात त्रिशूळ असून ती भ्रष्टाचार, अत्याचार, स्त्री भ्रूणहत्या, अन्याय याचा बीमोड करत आहे. याबरोबरच देवीच्या हातात मोह, माया, राग, लोभ, मत्सर, क्रोध यावर नियंत्रण ठेवून जगण्याचा संदेश देण्यात येत आहे. यासाठी भारती ध्रुपद, गीता भोकरे, इंदू मुळे, सविता बागल, मेघा देशपांडे, वीणा गोवंडे, योगिता भावसार, अपर्णा कुलकर्णी, मृणाल देशपांडे, नीता गायकवाड यांनी सहकार्य केले.