आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ncc Cadet Demand Sports Competition Sponsor Aurangabad

एनसीसी कॅडेट्सना स्पर्धेसाठी हवेत प्रायोजक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशपातळीवर मराठी झेंडा मानाने फडकवणार्‍या औरंगाबाद विभागातील एनसीसी कॅडेस्ना राष्ट्रीय पातळीवर होणार्‍या स्पर्धांसाठी मदतीचा हात हवा आहे. नाही म्हणायला राज्य सरकार सोयी पुरवत आहेत, तरीही खेळासाठी लागणारा उत्तम ट्रॅकसूट, सवरेत्तम कंपनीचे बूट आणि ब्लेझरही तेवढेच महत्त्वाचे आहे. या वस्तू मिळाल्यास या मुलांचे मनोबल वाढेल. त्यामुळे या वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी उद्योजक, सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन एनसीसीच्या औरंगाबाद विभागाने केले आहे.

मराठी झेंडा ‘इंच इंच लढवू’ हा सैनिकी बाणा ठेवत महाराष्ट्रातील एनसीसी कॅडेट्सनी 26 जानेवारीला दिल्लीत होणार्‍या नॅशनल परेडमध्ये देशातील सर्व राज्यांमध्ये सलग चार वर्षे ‘प्रायमिनिस्टर बॅनर’ व ट्रॉफी मिळवण्याचा मान मिळवला. आता हे कॅडेट्स राष्ट्रीय स्पध्रेतही महाराष्ट्राचे नाव उंचावण्यासाठी सज्ज झाले आहेत.

खेळाडू घडावेत म्हणून..
परेडमध्ये अव्वल बाजी मारणार्‍या एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी खेळातही नाव कमवावे व त्यातून देशपातळीवरील चांगले खेळाडू घडावेत यासाठी या स्पर्धा घेण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. त्यासाठी देशभरातील एनसीसीच्या विद्यार्थ्यांसाठी दिल्ली येथे 17 ते 28 ऑक्टोबरपर्यंत एनसीसी नॅशनल स्पोर्ट्सचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पध्रेच्या माध्यमातून उत्कृष्ट खेळाडू निवडून भविष्यात ऑलिम्पिकसारख्या जागतिक स्पर्धांमध्येही विद्यार्थी जावेत या उद्देशानेच स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

यासाठी हवा मदतीचा हात
राज्य सरकार या स्पर्धेसाठी एनसीसीच्या विद्यार्थ्यांना कॅम्प, जेवण व भाडे असा खर्च करणार आहे. तो प्राथमिक स्वरूपात पुरेसाही आहे; परंतु प्रथमच होत असलेल्या या राष्ट्रीय स्पर्धेसाठी इतरांसारखे ट्रॅकसूट, ब्लेझर, स्पोर्ट शूज अशा वस्तूंची गरज आहे. या वस्तू शासनाकडून मिळत नाहीत. मात्र, महाराष्ट्रातील मुले दिल्लीला रुबाबात जावीत यासाठी संस्था अथवा उद्योजकांच्या पुढाकाराची गरज आहे.

विभागाची मोठी कामगिरी
एनसीसीचे डीजे हे मुख्यालय दिल्लीत आहे. महाराष्ट्रात 7 ग्रुप असून एक औरंगाबाद विभागात आहे. या विभागात अहमदनगर, अमळनेर, धुळ्यासह मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांचे मिळून 9 बटालियन आहेत. एकूण 18 हजार विद्यार्थी या विभागात आहेत. दिल्ली परेडमध्ये औरंगाबाद विभागातील विद्यार्थ्यांचा जास्त समावेश असतो. या विद्यार्थ्यांनीच सलग चार वर्षे ‘प्रायमिनिस्टर बॅनर’ व ट्रॉफी मिळवण्याचा बहुमान पटकावला आहे.

पैसे नकोत, फक्त वस्तू द्या
एनसीसीच्या विद्यार्थ्यांना चांगली तालीम व प्राथमिक स्वरूपाचा खर्च करण्यासाठी सरकार पुढाकार घेतेच. केवळ विद्यार्थ्यांचे मनोबल वाढावे म्हणून अत्याधुनिक साहित्यांची त्यांना गरज आहे.आम्हाला कुठल्याही संस्थांकडून पैशांची मदत नको. केवळ त्यांनी दिलेल्या वस्तू आम्हाला हव्या आहेत. त्यासाठी ट्रॅकसूट अथवा कुठल्याही वस्तूंवर आम्ही त्या संस्थेची जाहिरात होईल असे लोगो वापरू.-सुनील चतुर्वेदी, कर्नल, एनसीसी, औरंगाबाद विभाग

विद्यार्थी खूप शार्प आहेत
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांमध्ये खूप पोटॅन्शियल आहे. त्यांच्याकडून मी खेळाबाबतची संपूर्ण तयारी करून घेत आहे. ही मुले नक्कीच दिल्लीत महाराष्ट्राचे नाव उज्‍जवल करतील.-डी. डी. दयालन, कर्नल, एनसीसी स्पोर्ट