आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • NCP Corporaters From Aurangabad Submit Resignations To Enter MIM

औरंगाबादमध्ये \'एमआयएम\'ची ताकद वाढली, राष्ट्रवादीला भगदाड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत एमआयएम या पक्षाच्या दोन जागा निवडून आल्या आहेत. त्यातील एक जागा औरंगाबादची तर दुसरी मुंबईतील आहे. आता राष्ट्रवादीचे पाच नगरसेवक एमआयएममध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. त्यांची नावेही समोर आल्याने जोरदार राजकीय कल्लोळ उडाला आहे.
जुबेर लाला, अक्रम पटेल, अशोक बेरे, अफसर खान आणि कलिल खान यांनी राष्ट्रवादीच्या नगरसेवकपदाचे राजीनामे दिले आहेत. पाचही जण एमआयएममध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे. असे झाले तर एक आमदार आणि या नगरसेवकांच्या बळावर एमआयएमची ताकद वाढणार आहे.
राष्ट्रवादीप्रमाणेच कॉंग्रेसचेही काही नगरसेवक एमआयएमच्या संपर्कात असल्याचे समजते. म्हणजेच येत्या काही दिवसांत कॉंग्रेसचे बंडखोर एमआयएममध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत एमआयएम जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.