आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्ट्रवादीच्या मोर्चाला अडीच तास उशीर; मुंडे 15 मिनिटांत गेले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी क्रांती चौकातून विभागीय आयुक्तालयावर हल्लाबोल मोर्चा काढला. मोर्चाची वेळ सकाळी १०.३० ची असताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे तब्बल अडीच तास उशिराने येत एक वाजता मोर्चात सहभागी झाले. त्यानंतर अवघी पंधरा मिनिटे थांबून क्रांती चौक मशिदीपासून निघून गेले. राज्य सरकार अपयशी ठरले आहे. शेतकरी, शासकीय कर्मचारी संपावर जात आहेत. आता सरकारलाच संपावर पाठवावे लागणार असल्याचे या वेळी मुंडे म्हणाले. 

 

भोकरदनला जायचे असल्यामुळे मुंडे गेले निघून : मोर्चासाठी कार्यकर्ते क्रांती चौकात थांबले होते. ११.३० वाजता गर्दी जमण्यास सुरुवात झाली. काही जणांना हा मोर्चा कांचनवाडीला असल्याचे वाटल्याने ते तिकडेच थांबल्याचे काशीनाथ कोकाटे यांनी सांगितले. त्यामुळे गर्दी जमण्यास वेळ लागला. मुंडे दुपारी एक वाजता आले. त्यानंतर माध्यमाशी दोन मिनिटे बोलत त्यांनी क्रांती चौक मशिदीपर्यंत मोर्चात पायी सहभाग घेतला. भोकरदनमध्येदेखील एक वाजता मोर्चा होता. तेथे कार्यकर्ते थांबले होते. त्यामुळे ते लवकर गेल्याचे कोकाटे यांनी सांगितले. २९ नोव्हेंबरला सर्व तहसील कार्यालयांवर मोर्चा काढण्यात येणार आहे. 

 

मोदी, फडणवीस कुत्ता असल्याच्या घोषणा 
मोर्चा सुरू होण्यापूर्वी काही युवकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात ‘शरद पवार-अजित पवार का कुत्ता कैसा हो, नरेंद्र मोदी-देवेंद्र फडणवीस जैसा हो’ अशी घोषणाबाजी केली. 

बातम्या आणखी आहेत...