आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ncp Not Support Prashant Bamb In Gangapur Election

आमदार प्रशांत बंब यांच्याशी युती नाही - कृष्णा पाटील डोणगावकर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गंगापूर - जिल्हा परिषदेच्या 9 व पंचायत समितीच्या 18 जागांसाठी आघाडीसाठी काँग्रेसशी बोलणी चालू असून दोन्ही बाजूंनी सकारात्मक चर्चा चालू आहे. परंतु गंगापूरचे अपक्ष आमदार प्रशांत बंब हे राष्ट्रवादीशी आघाडी करणार असल्याचा एकतर्फी प्रचार करीत असून आमदार बंब यांच्याशी कोणत्याही परिस्थितीत युती न करण्याचा निर्णय वरिष्ठांनी घेतला असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते कृष्णा पाटील डोणगावकर यांनी दिली.
राष्ट्रवादीच्या आजच्या निर्णयामुळे नुकत्याच झालेल्या नगरपालिक निवडणुकीत आमदार प्रशांत बंब यांनी ऐनवेळी राष्ट्रवादीशी आघाडी करण्यास नकार दिल्याचा बदला राष्ट्रवादीने घेतल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत आमचे 7 सदस्य निवडून आणण्याचा निर्धार आहे. पंचायत समितीमध्ये 4 सदस्य निवडून आलेले असून या वेळेस बहुमत मिळवण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे कृष्णा पाटील डोणगावकर यांनी सांगितले.