आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अडगळीतील नेत्यांची शरद पवारांवर टीका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - काही महाभाग अडगळीत पडल्याने शरद पवारांवर टीका करून मोकळे झाले. पवारांचे योगदान अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे. फक्त लोणी आजूबाजूच्या पाच-पन्नास गावांचे राजकारण करणाऱ्यांनी पवारांना राजकारण शिकवू नये. फक्त मंत्री होण्यासाठी त्यांनी पक्ष बदलले याचा त्यांना विसर पडला असावा. मराठवाड्याला हक्काचे पाणी देण्याचा निर्णय आम्ही घेतला अन् टीएमसी पाणी दिले तेव्हा ‘एक थेंब पाणी मराठवाड्याला देणार नाही’ असे ते म्हणाले होते. त्याचाही विसर पडलेला दिसतो. वयाेमानानुसार असे होते, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माजी मंत्री बाळासाहेब विखे पाटीलांचा समाचार घेतला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने येत्या सोमवारी (१४ सप्टेंबर) मराठवाड्यात जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. त्याच्या तयारीसाठी तटकरे शहरात आले होते. त्यांनी पक्षाच्या हडको येथील कार्यालयात कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. विखे पाटील यांचा उल्लेख टाळत, राज्य तसेच देशात राजकारण करणाऱ्यांना पवारांवर आरोप करण्याचा अधिकार आहे का? ते तोंडाला ‘मास्क’ लावून बोलत आहेत. त्यांचा बोलविता धनी कोण हे लवकरच समोर येईल. पण त्यांनी आपण स्वत: कोठे आहोत, याचा विचार करावा, असे तटकरे म्हणाले.
मराठवाड्यासह इतर प्रदेशांत करावयाच्या जेलभरो आंदोलनासंदर्भात मार्गदर्शन करताना सुनील तटकरे.
पवारांनी दिला होता इशारा
तीन दिवस आंदोलन
राष्ट्रवादीचे नेते तगडे म्हणून आरोप
सिंचनघोटाळ्यात काँग्रेस नव्हे तर फक्त राष्ट्रवादीच्याच नेत्यांवर आरोप का होतात, असा सवाल केला गेला, तेव्हा सिंचनाचे प्रकल्प राष्ट्रवादीच्या स्थापनेपूर्वीपासून सुरू होते. परंतु आता फक्त राष्ट्रवादीच्याच नेत्यांवर आरोप होतो. कारण काँग्रेसमध्ये दखलपात्र नेते नाहीत. त्यामुळेच ज्या झाडाला आंबा असतो तेथेच दगड मारले जातात. म्हणून राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आरोप होत असावेत, असा खुलासा तटकरे यांनी केला.
मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची सर्वप्रथम पवार यांनी पाहणी केली तेव्हाच त्यांनी दुष्काळ जाहीर करण्यासाठी जेलभरोचा इशारा दिला होता. राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचारी नेत्यांना जेलमध्ये घालू, अशी भाषा करणाऱ्या युती शासनाविरोधातील हे आंदोलन लक्षवेधी असावे, अशा खास सूचना नेतृत्वाने दिल्याचे समजते. तालुक्याच्या ठिकाणी राष्ट्रीय तसेच राज्य महामार्गावर आंदोलन केले जाणार आहे. प्रदेशाध्यक्षांसह पक्ष पदाधिकारी यात सहभागी होणार अाहेत.
मराठवाड्यात १४, उत्तर महाराष्ट्रात १५ तर पश्चिम महाराष्ट्रात १६ सप्टेंबरला "जेलभरो' केले जाणार आहे. हडको येथील राष्ट्रवादी भवनात तटकरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. या वेळी माजी मंत्री राजेश टोपे, युवा शाखेचे प्रदेशाध्यक्ष निरंजन डावखरे, आ. सतीश चव्हाण, माजी आ. संजय वाघचौरे, माजी खा. गणेश दुधगावकर, आ. भाऊसाहेब चिकटगावकर, शहराध्यक्ष काशीनाथ कोकाटे, किशोर पाटील, रंगनाथ काळे, मनमोहनसिंग ओबेरॉय आदी या वेळी उपस्थित होते.