आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • NCP Took Lead In Elections Of Local Bodies In Marathwada

नगर पंचायत निवडणूक : दुष्काळाचा सत्ताधाऱ्यांना फटका, राष्ट्रवादीचा गजर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोष मतपेटीतून दिसला, पंकजा पालवे, रावसाहेब दानवेंना हादरा, धनंजय मुंडेंनी बीड तर राजेश टोपे यांनी जालना जिल्हा राखला
औरंगाबाद - अच्छे दिनाचे गाजर दाखवून केंद्र आणि राज्याची सत्ता काबीज करणाऱ्या भाजप आणि शिवसेनेला मात्र नगर पंचायत निवडणुकीत ग्रामीण जनतेने नाकारले. दुष्काळाचा प्रचंड रोष या निकालातून दिसून आला. घनसावंगी, जाफराबाद, आष्टी, पाटोदा, शिरूर कासार या नगर पंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवले. भाजपला वडवणी आणि जळकोटवरच समाधान मानावे लागले. शिवसेनेने अवघ्या मंठा पंचायतीवर बहुमत मिळवले. चाकूर आणि देवणीच्या मतदारांनी मात्र कोणा एकाच्या हाती सत्तेची सूत्रे न देता त्रिशंकू निकाल दिला आहे. सर्वाधिक ७२ सदस्य राष्ट्रवादीचे, त्याखालोखाल भाजप ६४, सेना २५, १७ अपक्षाबरोबरच एमआयएमनेही ३ जागांवर विजय मिळवला.

कमळ कोमेजले, घड्याळाची टिकटिक
बीड | जिल्ह्यात आष्टी, पाटोदा, शिरूर आणि वडवणी नगर पंचायत निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप यांच्या बरोबरीने मनसे, काँग्रेस आणि अपक्षांनीही मोठ्या प्रमाणात नशीब आजमावले. विधानसभेसारखे स्वरूप देत भाजपने पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना प्रचारात उतरवले होते. पालकमंत्री पंकजा मुंडे यांनीही सभा घेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला होता. विराेधी पक्षनेतेपद अाैटघटकेचा खेळ अाहे, या पंकजांच्या टीकेने अधिकच चर्चा रंगली हाेती. मात्र, धनंजय मुंडे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्ह्यात पुन्हा बळकटी मिळवली. भाजपने दाखवलेले अच्छे दिन हे सध्या बुरे दिन असल्याचे मतदारांनी मतपेटीतून दाखवून दिले. दुष्काळाचा रोषही या निमित्ताने स्पष्ट अधोरेखित झाला.
पुढे वाचा, बालेकिल्ल्यात काँग्रेसची पिछेहट...आणि वाचा सर्व नगर पंचायतींचा कौल...