आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अडीच लाख ग्राहकांना भरावी लागेल गॅस सिलिंडरसाठी पूर्ण रक्कम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - एक जानेवारीपासून शहरात पुन्हा गॅस सिलिंडरचे अनुदान बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. शहरात लाख २८ हजार १५७ गॅस ग्राहक असून त्यापैकी दोन लाख ५१ हजार ३८२ ग्राहकांचे बँकेत संलग्नीकरण झाले नाही. त्यामुळे या ग्राहकांना जानेवारीत सिलिंडरसाठी बाजारमूल्यानुसार पैसे मोजावे लागणार आहेत.

पूर्वी सिलिंडरवरील अनुदानासाठी गॅस एजन्सीत केवायसी, आधार कार्ड क्रमांक देऊन पुन्हा बँकेत जाऊन केवायसी आणि बँक खात्याशी संलग्नीकरण अशी प्रक्रिया करावी लागत होती. त्यातही आधार क्रमांक नसल्यास अडचण येत होती. मात्र, दुसऱ्या टप्प्यात आधार कार्ड ऐच्छिक करण्यात आले असून संलग्नीकरणासाठी बँकेत जाता केवळ एजन्सीवर जाऊन अर्ज जमा केल्यास एजन्सीमार्फतच बँक संलग्नीकरण केले जाणार असून ग्राहकांचे अनुदान बँकेत जमा होईल.

संलग्नीकरणासाठीकागदपत्रे : संलग्नीकरणासाठीगॅसग्राहकांनी बँकेत जाता केवळ एजन्सीवर बँक खाते क्रमांक, असल्यास आधार कार्ड, गॅस पासबुकची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स, धनादेशाची झेरॉक्स एजन्सीवर द्यायची आहेत.

८०९ रुपये लागणार
सद्याविनाअनुदानित सिलिंडरची बाजारभावाप्रमाणे किंमत ८०९ रुपये आहे. हीच किंमत पुढील महिन्यात राहिल्यास ज्या ग्राहकांकडून संलग्नीकरण करण्यात आले नाही, अशांना ८०९ रुपये मोजावे लागणार आहेत. अशा ग्राहकांची संख्या अडीच लाखांवर आहे.

चांगलीयोजना, ग्राहकांना लाभ
-कामात पारदर्शकता आणण्यासाठी ही प्रक्रिया लागू करण्यात येणार आहे. ग्राहकांनी तत्काळ संलग्नीकरण करून लाभ घ्यावा, अन्यथा त्यांना जास्तीचा भुर्दंड बसेल. भास्करआठल्ये, संचालक,भास्कर गॅस.