आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Near About १५०० Temple In Aurangabad City

कायदा-सुव्यवस्था धोक्यात आणण्याच्या दीड हजार संधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - एप्रिलमध्ये होणारी महापालिकेची निवडणूक डोळ्यासामोर ठेवून समाजकटकांनी ठरवले तर या शहराची शांतता आणि सुव्यवस्था धोक्यात आणणे त्यांना सहज शक्य आहे. कारण अशा जवळपास १५०० संधी धार्मिक स्थळांच्या रूपाने त्यांच्यासाठी औरंगाबाद शहरात खुल्या आहेत.

सन २०१० मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीच्या आधी शहरातील दोन धार्मिक स्थळी समाजकंटकांनी विटंबना करून शहरातील शांतता धोक्यात आणली होती. त्या वेळी शहरात तणाव निर्माण झाला होता.
त्यामुळे धार्मिक स्थळांचे संरक्षण हा पोलिसांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील मुद्दा बनला आहे. धार्मिक स्थळांची होणारी विटंबना आणि तिथे होणाऱ्या चोऱ्या यामुळे पोलिसांवरचा ताण वाढत चालला असून त्यांना मुख्य काम करणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. अशा परिस्थितीत पोलिसांवरचा ताण कमी करण्यासाठी आणि एकूणच सामाजिक आरोग्य राखण्यासाठी धार्मिक स्थळी विशेष काळजी घेतली जाणे आवश्यक बनले आहे.

आधीच आहे पोलिसांवर ओझे
ब्युरो आफ पोलिस रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात ६१४ लोकसंख्येमागे एक पोलिस अशी व्यवस्था असायला हवी. मात्र, सध्या एक पोलिस ८२९ व्यक्तींसाठी काम करतो आहे. हीच परिस्थिती प्रत्येक शहरात आहे. औरंगाबाद त्याला अपवाद नाही. अशा परिस्थितीत पोलिसांवरचा ताण कमी करणे हे औरंगाबादकरांच्याच हिताचे आहे आणि त्यासाठी धार्मिक स्थळी सीसीटीव्ही कॅमेरे लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
जैन मंदिरांनी दिला धडा
जैन मंदिरांमध्ये पंचधातूच्या मूर्तीबरोबरच अनेक मौल्यवान वस्तूही असतात. त्यामुळे या मंदिरांमध्ये चोरीचे प्रमाण अधिक असते, असे आढळून आले आहे. त्यामुळे खंडेलवाल दिगंबर समाजाने शहरातील चौदाही जैन मंदिरांत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करून दिली आहे. तेव्हापासून जैन मंदिरातील चोऱ्यांचे प्रमाण अत्यल्प झाले असून जिथे चोरी झाली तिथले चोरटे ताबडतोब पकडलेही गेले आहेत. त्यामुळे अशा यंत्रणेचा लाभ वेगळ्या पद्धतीने सांगण्याची आवश्यकताच राहिलेली नाही.
पुढील स्‍लाइडवर वाचा, औरंगाबादमधील मंदीरांची संख्‍या..