आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमानतळानजीकच्या लोकांनी मनपाच्या पथकाला पिटाळले, अतिक्रमणधारकांना नोटिसा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - चिकलठाणा विमानतळाच्या भिंतीलगत असलेल्या अतिक्रमणांवर मनपा लवकरच कारवाई करणार असून आज मनपाच्या पथकाने या भागांची पाहणी केली भिंतीला खेटून असणाऱ्या काही रहिवाशांना नोटिसाही दिल्या. दरम्यान, पथकातील कर्मचारी आणि नागरिकांत वाद निर्माण झाला. शेवटी लोकांनी पथकाला पिटाळून लावले.

दोन दिवसांपूर्वी चिकलठाणा विमानतळाच्या धावपट्टीवर आलेल्या मोकाट कुत्र्यांमुळे विमानाचे उड्डाण तब्बल दीड तास खोळंबले होते. या प्रकाराची विमानतळ प्राधिकरणाने गांभीर्याने दखल घेत याकामी असलेले मनपाचे विषय मार्गी लावण्याची विनंती केली होती. त्यानुसार बुधवारी सायंकाळी मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी विमानतळाला भेट दिली तेथे एक बैठक घेतली. त्यात विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी मनपाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर "दिव्य मराठी'शी बोलताना बकोरिया म्हणाले की, कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी मनपाची डाॅग व्हॅन पथक तेथे दिवसातून तीन ते चार वेळा फेऱ्या मारेल ज्या भागातून विमानतळावर कुत्री जाऊ शकतात त्यावर उपाययोजना करेल. विमानतळाच्या भिंतीलगतची अतिक्रमणे चिंतेचा विषय असून भिंतीपासून किमान १० फूट बांधकाम नसावे, असे विमानतळ प्राधिकरणाचे म्हणणे असून त्यानुसार कारवाई केली जाणार आहे, असे आयुक्त म्हणाले.
नागरिकमनपात : दरम्यान,मनपाच्या पथकाने विमानतळ परिसरात पाहणी केल्यानंतर नागरिकांत घबराट पसरली. शाहूनगर, रमाबाई आंबेडकर नगर येथील नागरिकांची घरे हटवू नयेत, अशी मागणी करण्यासाठी काही नागरिक सर्वपक्षीय दलित अत्याचारविरोधी कृती समितीचे नेते मनपात आले. त्यांनी उपमहापौरांना याबाबत निवेदन दिले. त्यात म्हटले अाहे की, सिडकोने बेघर योजनेअंतर्गत या वसाहती वसवल्या आहेत, त्यांना आता बेघर करू नये. या रहिवाशांचे आधी पुनर्वसन करून मगच घरे हटवावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.

पथकाचा नागरिकांसोबत वाद
कालआयुक्तांनी सांगितल्यावर आज मनपाचे पथक या भागात आले विमानतळाच्या भिंतीलगत असलेल्या वसाहतींची पाहणी केली. या पथकाने काही मालमत्ताधारकांना नोटिसाही देणे सुरू केल्यावर तेथील नागरिकांसोबत वाद झाल्यावर या पथकाने पाहणी करून आजचा दिवस संपवला. याबाबत उपायुक्त रवींद्र निकम म्हणाले की, मनपाचे पथक यादी तयार करत असून लवकरच पुढील आदेशानंतर कारवाई केली जाईल.
बातम्या आणखी आहेत...