आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद शहराजवळचे 8 दुर्लक्षित गडकिल्ले, जागतिक पर्यटन दिनानिमित्त विशेष रिपोर्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जिल्ह्यात किती किल्ले आहेत? सर्वांच्या तोंडी एकच नाव येते, ते म्हणजे दौलताबादच्या देवगिरी किल्ल्याचे. पण जिल्ह्यात एक-दोन नव्हे, तर किल्ले आहेत. अजिंठा ते वेरूळच्या डोंगररांगात हे किल्ले आहेत. त्यांना समृद्ध इतिहास असून पुरातत्त्व खात्यात नोंदही आहे, परंतु काळाच्या ओघात ते दुर्लक्षित झाले. त्यांची माहितीच नसल्याने पर्यटक तेथे फिरकतही नाहीत. डीबी स्टारने अशा किल्ल्यांची माहिती घेऊन त्यावर प्रकाश टाकण्याचा केलेला हा प्रयत्न. या ठिकाणांमुळे जिल्ह्यातील पर्यटनाला झळाळी मिळू शकते.

देवगिरीचा किल्ला हा देश-विदेशातील पर्यटकांना खुणावणारा मराठवाड्यातील महत्त्वाचा किल्ला. पर्यटक, संशोधक, अभ्यासक येथे येतात आणि रमतात. मात्र, याच्या तोडीस तोड तब्बल किल्ले आपल्या आसपासच आहेत. सर्वसामान्यांच्या स्मृतीतून ते केव्हाच दूर झाले आहेत. पुरातत्त्व खात्याच्या लेखीही त्यांची ऐतिहासिक वास्तूएवढीच किंमत उरली आहे. येथे पर्यटकांचा ओघ वाढला तर या वास्तूंचे हरवलेले वैभव परत मिळू शकेल.

नवीन स्थळांचे फायदे
अस्तित्वातअसणाऱ्या ठिकाणांवरच पर्यटकांचा ओघ असतो. जेवढी अधिक पर्यटनस्थळे विकसित होतील तेवढा त्यातून पर्यटक विभागला जाईल. पर्यटकांची एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही. पर्यटन सुखकर होईल. एक परदेशी पर्यटक सात जणांना रोजगार देऊन जातो. अशा नवीन ठिकाणी पर्यटकांचा ओघ वाढला तर त्या त्या ठिकाणी स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होतील.

१-अंतूर किल्ला, कन्नड, गौताळा अभयारण्य
कन्नडतालुक्यातील चिमणपूर गावाजवळ अंतूर किल्ला आहे. कन्नड गावाच्या ईशान्येकडे २४ किलोमीटरवर खान्देश पठारावरील एका टेकडीवर हा किल्ला आहे. तेथे जाण्यासाठी एकच नागमोडी वळणाचा रस्ता आहे. पायथ्यापासून किल्ल्यावर जाणारा मार्ग किमी आहे. १५ व्या शतकात मराठा सरदारांनी हा किल्ला बांधल्याचा इतिहास आहे. नंतरच्या पिढ्यांकडे तो १०० वर्षे होता. इथल्या शिलालेखांवरून तो १६ आणि १७ व्या शतकात अहमदनगरच्या निझामांनी काबीज केल्याचे कळते. किल्ल्याच्या कडा चौकोनी असून त्याचा घेर अंदाजे एक मैल आहे. ठरवीक अंतरावर बुरूज असणारी दुहेरी तटबंदी आहे. याचे प्रवेशद्वार भैरव दरवाजा नावाने ओळखले जाते. याच्या दोन बुरुजांवर चौकीदारासाठी खोल्या आहेत. किल्ल्यांच्या भिंतींची रचना मध्ययुगीन युरोपीय वास्तूसारखी आहे. एका शिलालेखात १०३५ हिज्री सालाचा उल्लेख आहे. किल्ल्याच्या आतील भागात मशीद, राजवाड्याचे अवशेष, दर्गा, पाण्याचे टाके आहेत. तीन बाजूंनी ७०० फूट खोल खंदक आहेत. येथून निसर्गाचे विहंगम दृश्य बघता येते. घाटनांद्राहून नागापूर मार्गे येथे पोहोचता येते. कन्नडमार्गेही जाता येते.

२-बैतालवाडी किल्ला
या किल्ल्याला वेताळवाडी किल्ला असेही म्हणतात. सहाव्या शतकात गुप्त घराण्याचा राजा विक्रमादित्यने हा किल्ला बांधल्याचा इतिहास असून सोयगावपासून सुमारे किमी अंतरावर आहे. उंडणगावहून हळदाकडे जाताना हा किल्ला लागतो. पायथ्याशी वाडी नावाचे गाव असून यास वाडीचा किल्ला असेही म्हणतात. यात प्रवेश करण्यासाठी असलेल्या दरवाजास वाडी दरवाजा, तर दुसऱ्यास हळदी दरवाजा म्हणतात. किल्ल्यात पाण्याचे टाके, घोडपागा, मशीद, भग्न राजवाडा आदी अवशेष दिसतात. खराब रस्त्यामुळे पर्यटक येथे जाणे टाळतात. अजिंठा डोंगररांगातील हे सर्वात उंच ठिकाण आहे.

३-लहुगड नांद्रा
औरंगाबादहूनसिल्लोडला जाताना १५ किलोमीटरवर चौका गाव लागते. तेथून डाव्या बाजूच्या रस्त्याने १८ किलोमीटरवर लहुगड नांद्रा आहे. हे रामेश्वर महादेवाचे ठिकाण. डोंगरात वसलेले असल्याने यास निसर्गाचे भरभरून वरदान लाभले आहे. महादेवाचे हेमाडपंती मंदिर असून ते डोंगराच्या मधोमध कोरलेले आहे. एका आख्यायिकेप्रमाणे येथे सीतेचे वास्तव्य होते. रामायणातील लव-कुश यांचे जन्मस्थळ म्हणूनही हे ठिकाण ओळखले जाते. येथे पाण्याच्या टाक्या, लेणी बघण्यासारख्या आहेत.

४-तालतम किल्ला
सोयगावतालुक्यातील जिंजाळा लेण्यापासून किलोमीटर अंतरावर तालतम किल्ला लागताे. घटोत्कच लेणीहून तो दृष्टिक्षेपास पडतो. हा किल्ला गिरिदुर्ग किंवा डोंगरी किल्ला प्रकारात मोडतो. यास जरंडी दरवाजा, बैतालवाडी दरवाजा, जिंजाळा दरवाजा हे तीन महत्त्वाचे दरवाजे आहेत. जरंडी दरवाजावर मुर्तूजा निझाम शहा हिजरी ९८९ इ.स. १५८० मधील लेख आहे. बैतालवाडी दरवाजावरही शिलालेख असून त्यात औरंगजेबाच्या नावाचा उल्लेख आहे. किल्ल्याची तटबंदी दगडी चिऱ्यांनी केलेली असून बुरुजांचे बांधकाम आहे. आतील भागात मशीद, राजवाडा पाण्याचे टाके आहे. याची प्रचंड प्रमाणावर पडझड झाली असून किल्ल्याचे अवशेष दिसतात. एक दर्गा, घुमट आणि मशिदीचा काही भाग आहे.

५-भांगसीमाता गडकिल्ला
औरंगाबादशहराजवळ असणारा हा किल्ला खरंतर गड म्हणून ओळखला जातो. तो देवगिरी किल्ल्याचा उपकिल्ला म्हणूनही ओळखला जातो.

६-सुतोंडा किल्ला
घाटनांद्राहूनकन्नड मार्गावर जाताना नायगव्हाणजवळ सुतोंडा किल्ला आहे.
७-राहिलगड-अंबडरोड ,जालना
८-मस्तगड-जालना
काळाच्या ओघात राहिले दुर्लक्षित, पर्यटकांचा ओघ वाढला तर वाढेल वैभव, स्थानिक पर्यटनालाही मिळेल चालना

मराठवाड्यात आहेत १२ किल्ले
१-धारूर किल्ला, तालुका धारूर, बीड जिल्हा
२-नळदुर्ग किल्ला, तालुका तुळजापूर, उस्मानाबाद जिल्हा
३-परांडा किल्ला, तालुका परांडा-उस्मानाबाद जिल्हा
४-माहूर किल्ला, तालुका माहूर-नांदेड जिल्हा
५-नंदगिरी किल्ला, नांदेड
६-कंधार किल्ला- तालुका कंधार-नांदेड जिल्हा
७-वडगाव किल्ला, तालुका कळमनुरी, हिंगोली जिल्हा
८-उद्ध्वस्त किल्ला, अंथाली गाव, तालुका वसमत, हिंगोली जिल्हा
९-अमरगड किल्ला, उमरखेड, तालुका जिंतूर, परभणी जिल्हा
१०-पाथ्री किल्ला, तालुका पाथरी, परभणी जिल्हा
११-उदगीर किल्ला, तालुका उदगीर, जिल्हा लातूर
१२-औसा किल्ला,तालुका औसा, जिल्हा लातूर