आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालनेकरांना पासपोर्टसाठी बसला तब्बल चार कोटींचा ‘फटका’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पासपोर्ट काढण्यासाठी नागपूर तर काहींना मुंबई येथे जाऊन प्रक्रीया पार पाडावी लागत असल्यामुळे जाणे-येण्यात वेळ वाया जाण्यासोबतच त्रुटी असल्यास अजून मानसिक त्रास सहन करावा लागतो. सहा वर्षाच्या काळात तेरा हजार पासपोर्टधारकांना चार कोटींचा फटका बसला आहे. दरम्यान, ही गैरसोय लक्षात घेऊन प्रत्येक जिल्ह्यात कॅम्प होत असल्यामुळे जालनेकरांच्या पासपोर्टच्या खर्चात तीन हजारांची ‘बचत’ होणार आहे.
विदेशवारीसाठी पासपोर्ट हा बंधनकारक आहे. जालना, परभणी, नांदेड, लातुर, हिंगोली, उस्मानाबाद या जिल्ह्यांतील नागरिकांना नागपूर हे मुख्यालय आहे. या ठिकाणी जाऊन ही प्रक्रीया पार पाडावी लागते. जालन्याहून नागपूर येथे जाण्यासाठी आदल्या रात्री बसून सकाळपर्यंत नागपूरला जाते. पासपोर्ट कार्यालयात दिवसभर गेल्यास दुसरा दिवसही या ठिकाणी जातो. यातून राहण्यासह तब्बल तीन ते साडेतीन हजारांचा खर्च होतो. शिवाय पासपोर्टमध्ये काही त्रुटी असल्यास तेवढाच खर्च होण्यासोबत मानसीक ताणही सहन करावा लागतो.
सहा वर्षाच्या कार्यकाळात आतापर्यंत तेरा हजार नागरिकांनी पासपोर्ट काढले आहेत. यात सहा वर्षात जालनेकरांना तब्बल चार कोटींचा फटका सहन करावा लागला आहे. याशिवाय, अनेकवेळा अनेक कुटूंब खाजगी वाहने करुन पासपोर्ट प्रक्रीयेसाठी नागपूर येथे जात होते. यात अपघात होऊन अनेकांना अपंगत्व आले आहे.

आता अशी आहे प्रक्रिया
कॅम्प होणार असल्यामुळे अगोदर ऑनलाईन अपॉइंटमेंट घेणे बंधनकारक आहे. यानंतर कॅम्पमध्ये कागदपत्रे स्विकारुन या ठिकाणी पासपोर्टधारकांचा थम्स घेतला जाणार आहे. यानंतर पंधरा दिवसाच्या कालावधीत पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून पासपोर्टधारकाची गुन्हेविषयक माहिती घेतली जाऊन ती माहिती ऑनलाईन नागपूरला पाठविली जाणार आहे.

कॅम्पसाठी नोंदणी गरजेची
जालन्यात१० ११ डिसेंबर हे दोन दिवस कॅम्प होणार आहे. परंतु या कॅम्पमध्ये ऑनलाइन नोंदणी केल्यानंतरच कागदपत्रे स्वीकारली जाणार आहेत. www.passportindia.gov.in या वेबसाइटवर अपॉइंटमेट घेणे गरजेचे आहे.

चार वर्षांपासून पाठपुरावा
^मराठवाड्यात स्वतंत्र पासपोर्ट कार्यालयासाठी आंदोलने, उपोषणे करूनही दखल घेतल्यामुळे न्यायालयात दाद मागितली असून याचिकेवर सुनावणी सुरू आहे. कॅम्पमुळे खर्चाची बचत होण्यासोबतच मानसिक ताणही कमी होणार आहे. राहुलशिंदे, याचिकाकर्ते, जालना.

महिन्याला३०० अर्ज
^दरमहिन्याला २५० ते ३०० पासपोर्टसाठी अर्ज येतात. याचे व्हेरिफिकेशन झाल्यानंतर रिपोर्ट ऑनलाइन पाठविल्या जातो. आतापर्यंत तेरा हजारांच्या आसपास पासपोर्ट निघाले आहेत. व्ही.एस. गडकरी, पासपोर्ट तपासणीस, पोलिस अधीक्षक कार्यालय, जालना.

हायकोर्टात जनहित याचिका
मराठवाड्यात स्वतंत्र पासपोर्ट कार्यालय होण्यासाठी जालना येथील इंडियन ख्रिश्चन युनायटेडचे जिल्हाध्यक्ष राहुल शिंदे यांनी औरंगाबाद येथील अॅड. श्रीकृष्ण सोळंके यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सुनावणी सुरू आहे.
बातम्या आणखी आहेत...