आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Need To See In Terms Of Scientific History: Devanand Shinde

इतिहासाकडे वैज्ञानिक दृष्टीने पाहण्याची गरज : देवानंद शिंदे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवाजी महाविद्यालयात राष्ट्रीय इतिहास परिषदेचे उद्घाघाटन करताना मान्यवर. - Divya Marathi
शिवाजी महाविद्यालयात राष्ट्रीय इतिहास परिषदेचे उद्घाघाटन करताना मान्यवर.
कन्नड- इतिहासाच्याअभ्यासात भावनेपेक्षा वस्तुनिष्ठतेला महत्त्व आहे. इतिहास हा भूतकाळ आणि वर्तमानाचा संवाद असतो. इतिहास हा मित्र, मार्गदर्शक शिक्षकाची भूमिका बजावतो. युद्ध हे सर्व प्रश्नांचे उत्तर आहे, हा समज आजच्या काळात अत्यंत चुकीचा आहे. तिसरे महायुद्ध केवळ इतिहासकारांमुळे टळले. त्यामुळे इतिहासाकडे वैज्ञानिक दृष्टीने पाहण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी सोमवारी केले.
शिवाजी महाविद्यालयात इतिहास विभाग विद्यापीठ अनुदान आयोग यांच्य संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मराठ्यांच्या इतिहासलेखनाचे पुनर्लेखन’ या विषयावर राष्ट्रीय इतिहास परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. परिषदेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कोशाध्यक्ष डॉ. डी. डी. शिंदे होते, तर इतिहासकार श्रीमंत कोकाटे, संस्थेचे उपाध्यक्ष अशोकराव आहेर, प्रदीप म्हैसकर, दिलीपराव नागदकर, चंद्रकांत देशमुख, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डाॅ. राजेश करपे, प्राचार्य विजय भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी इतिहासकार श्रीमंत कोकाटे म्हणाले की, समाजाच्या मानसिक, सामाजिक, बौद्धिक स्वातंत्र्यासाठी इतिहासाच्या पुनर्लेखनाची आवश्यकता आहे. मराठ्यांचा इतिहास ही व्यापक संकल्पना असून शिवाजीराजांनी अठरापगड जाती, १२ बलुतेदार या सर्वांना सोबत घेऊन स्वराज्य उभारले. यातून ‘मराठा’ ही संकल्पना पुढे आली. प्रसिद्ध गायक राहुल खरे यांनी स्वागत गीत गायले, प्राचार्य भोसले यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी शोधग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.

इतिहासाच्या पुनर्लेखनाची आवश्यकता
शिवाजीमहाराजांचा लढाधार्मिक लढा नसून तो केवळ राजकीय लढा होता. मात्र, पुढे त्याला इतिहासकारांनी वेगळे रूप दिले. यासाठी खरा इतिहास जगासमोर येण्यासाठी, शांतता, समता, बंधुता निर्माण होण्यासाठी इतिहासाच्यास पुनर्लेखनाची आवश्यकता आहे. आजपर्यंत इतिहासाची मांडणी पुराणमतवादी पद्धतीने झाली. ब्रिटिशांनी साम्राज्यवादी अंगाने इतिहासाची मांडणी केली, महात्मा फुलेंनी सत्यशोधक पद्धतीने इतिहास लिहिल्याचे डॉ. डी. डी. शिंदे म्हणाले.