आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Need To Survey Is Companies' Council Of Environmental And Health

"त्या' कंपन्यांचे सर्वेक्षण करणे अत्यंत गरजेचे, पर्यावरणाचे आरोग्य परिषदेतील आवाज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- केंद्र,राज्याने पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्नशील असलेल्या संशोधकांना अर्थसाह्य करावे, खासगी कंपन्या ‘हजार्ड्स वेस्ट’ नष्ट करण्यासाठी प्रकल्पांची उभारणी करत आहेत की नाही, यासाठी सर्वेक्षण करावे, असे उपाय पर्यावरण परिषदेच्या समारोपापूर्वी तज्ज्ञांच्या गटचर्चेतून पुढे आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राणिशास्त्र विभाग आणि नॅशनल एन्व्हायर्नमेंटॅलिस्ट असोसिएशन यांच्या विद्यामाने आयोजित ‘पर्यावरणाचे आरोग्य’ राष्ट्रीय परिषदेचा बुधवारी समारोप झाला.

परिषदेच्या समारोपीय सत्राला हजारीबागच्या आचार्य विनोबा भावे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. गुरुदीप सिंग आणि प्रकुलगुरू डॉ. एम. पी. सिन्हा उपस्थित होते. डॉ. गुरुदीप सिंग यांच्या अध्यक्षतेत प्रा. डॉ. यशवंत खिल्लारे, पर्यावरण विभागाचे प्रा. डॉ. सतीश पाटील, प्रा. डॉ. ई. आर. मार्टिन, बंगळुरू येथील विद्यापीठाच्या प्रा. डॉ. बेला झुत्सी आणि परिषदेचे आयोजक डॉ. दौलत सोनवणे यांनी चर्चेत सहभाग घेतला. चर्चेतून पुढे आलेले उपाय केंद्र आणि राज्य सरकारांना सुचवण्यात येतील.

सायंकाळी समारोप
वित्त लेखाधिकारी डॉ. सय्यद अझरुद्दीन, डॉ. गुरुदीप सिंग, डॉ. सिन्हा, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील स्कूल ऑफ एन्व्हायर्नमेंटल अँड अर्थ सायन्सचे संचालक डॉ. एस. पी. इंगळे यांच्या उपस्थितीत, प्राणिशास्त्राचे विभागप्रमुख डॉ. चंद्रशेखर हिवरे यांच्या अध्यक्षतेत सायंकाळी समारोप झाला.