आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘पेट’चे निगेटिव्ह मार्किंग रद्दबातल, 1153 विद्यार्थी पुन्हा पात्र

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा  विद्यापीठाच्या वतीने १४ आणि १५ जुलै २०१७ रोजी घेतलेल्या  ‘पेट’ म्हणजेच पीएचडी एंट्रन्स टेस्टच्या निकालातील निगेटिव्ह मार्किंग अखेर रद्द करण्यात आली आहे. निगेटिव्ह मार्किंगमुळे केवळ ३२६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. आता दुसऱ्यांदा निकाल जाहीर केला जाईल. यामुळे १ हजार १५३ विद्यार्थ्यांना संशोधन करता येईल. 

अनेक विद्याशाखांत दीड हजार जागा रिक्त असल्याचे ‘दिव्य मराठी’ने समोर आणल्यानंतर विद्यार्थी संघटनांनी तीव्र आंदोलन केले होते. त्यानंतर हा निर्णय झाला. दरम्यान, एम.फिल सीईटीसाठी ‘निगेटिव्ह मार्किंग’ कायम राहणार असल्याचा दावा कुलगुरूंनी केला. कला विद्या शाखा वगळता इतर विद्याशाखांमध्ये सुमारे दीड हजार जागा रिक्त असल्याचे ‘दिव्य मराठी’ने उघडकीस आणले होते. त्यानंतर विद्यार्थी संघटनांनी एकजूट दाखवत तीव्र आंदोलन केले होते.
बातम्या आणखी आहेत...