आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुठे रिलायन्स मॉलजवळ आग तर, कुठे मारहाण...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- गारखेडा परिसरातील रिलायन्स मॉलच्या मागील बाजूस असलेल्या जनरेटरजवळील कचऱ्याला रविवारी दुपारी दीडच्या सुमारास आग लागली. सिडको अग्निशमन दलाचे कर्मचारी वेळेवर पोहाेचल्यामुळे आग नियंत्रणात येऊन दुर्घटना टळली.
रिलायन्स मॉलच्या मागील बाजूस चार जनरेटरचा सेट आहे. दुपारी दीडच्या सुमारास हलका स्फोट होऊन सेटच्या बाजूला असलेल्या कचऱ्याला आग लागली. रविवार असल्यामुळे मॉलमध्ये गर्दी होती. त्यामुळे एकच धांदल उडाली. कर्मचाऱ्यांनी पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला. जनरेटरच्या बाजूचा कचरा जळाल्याने परिसरात धूर होऊन भीतीचे वातावरण पसरले. घटनास्थळापासूनच जवळच मॉलचे स्टोअर रूम आहे. मात्र वेळीच आग आटोक्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली. अवघ्या दहा मिनिटांत पोहोचलेल्या सिडको येथील अग्निशमन दलाच्या एका बंबद्धारे १५ मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवले. एस. के भगत, व्ही. व्ही. बाकड, सोमीनाथ भोसले, अशोक वेलदोडे, अशोक वाघ या जवानांचा पथकात समावेश होता.

फोटोकाढण्यास मज्जाव :
आगीनंतरकाही ग्राहकांनी मोबाइलद्वारे फोटो काढण्यास सुरुवात केली. मात्र मॉल प्रशासनाने त्यांना मज्जाव केला. सुरक्षारक्षकांनी काही लोकांवर हातही उचलला. वर्तमानपत्राच्या छायाचित्रकारांनाही फोटो काढण्यास मनाई केली जात होती.
पुढीस स्लाइड्सवर वाचा, इतर क्राइम न्यूज...