आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेट-सेट तयारी वर्गाचे शुल्क झाले कमी, वृत्त प्रसिद्ध होताच विद्यापीठ प्रशासनाने घेतला निर्णय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या नेट-सेट परीक्षा तयारी वर्गाच्या शुल्कात अखेर कपात करण्यात आली. आता हे शुल्क हजार रुपये राहता पूर्वीप्रमाणेच फक्त २०० रुपयेच राहणार आहे. या शुल्कातच तीन महिन्यांचे हे प्रशिक्षण मिळणार आहे. डीबी स्टारने वृत्त प्रसिद्ध करताच विद्यापीठ प्रशासनाने तत्काळ हा निर्णय घेतला.

पदव्युत्तर विद्यार्थी सेट, नेटचा मार्ग निवडतात. या परीक्षांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्री-आयएएस कोचिंग अँड नेट-सेट एक्झामिनेशन गायडन्स सेंटरमध्ये यासाठी खास पूर्वतयारी वर्गाचे आयोजन केले जाते. वर्षातून दोन वेळा तीन-तीन महिन्यांचे प्रशिक्षण वर्ग घेतले जातात. यासाठी नाममात्र २०० रुपये शुल्क आणि १००० रुपये अनामत घेतले जात होते. यंदा २९ मे २०१६ रोजी सेट तर २६ जून २०१६ रोजी नेटची परीक्षा होणार आहे. यासाठी केंद्राने शुल्कात दहा पटींनी वाढ केली होती. यामुळे विद्यार्थ्यांना २०० रुपयांएेवजी २००० भरावे लागणार होते. विद्यार्थ्यांनी डीबी स्टारकडे कैफियत मांडली. त्यावर चमूने "विद्यापीठाने दहा पटींनी वाढवले सेट-नेट तयारी वर्गाचे शुल्क’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची गंभीर दखल घेत विद्यापीठाने ही दरवाढ रद्द केली. आता २०० रुपयांतच या वर्गाला प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे मुलांची अडचण दूर झाली आहे.

डीबी स्टार दणका
शुल्क वाढवल्यामुळे आमचे नेट-सेटचे करिअर धोक्यात आले होते. मात्र, डीबी स्टारने वृत्त प्रकाशित केल्यामुळे आमचे हे स्वप्न पूर्ण होणार आहे. - एक विद्यार्थी

मोफतवर्ग घ्यावे
वृत्तानंतर विद्यापीठाने हजार रुपयांचे शुल्क पुन्हा २०० रुपयांवर आणले. पण दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेता हे वर्ग मोफत घ्यायला हवेत. -एक विद्यार्थी