आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Netions Song At Aurangabad Bye Divyamarathi Big Event

देशासाठी 52 सेकंद मी देणार!.. आणि तुम्ही?

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रगीत म्हणजे देशाचा आत्मा, देशाची ओळख. क्रांतिकारकांच्या, हुतात्म्यांच्या बलिदानाला सलाम करण्यासाठी, त्यांच्या बलिदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मोठय़ा संख्येने, एकत्र, राष्ट्रगीत म्हणण्यासाठी सर्वजण एमजीएमच्या मैदानावर येणार आहेत. आपणही आपल्या सर्व मित्र-मैत्रिणींसह राष्ट्रभक्ती जोपासण्यासाठी नक्की या! आपल्या बुलंद आवाजाने भारतीय राष्ट्रगीत गायन करून आपण गिनीज बुक ऑफ वल्र्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंद करणार आहोत.
देशासाठी माझ्याकडे वेळ आहे
राष्ट्रगीत देशाचा मान आहे. राष्ट्रगीत हे एकतेचे प्रतीक आहे. त्यामुळे शाळेत सर्वप्रथम राष्ट्रगीतच शिकवले जाते. मी 26 जानेवारीला सकाळी 10 वाजता राष्ट्रगीत गायनासाठी एमजीएम मैदानावर हजर राहणार आहे. जागतिक विक्रम नोंदवण्याच्या या उपक्रमामध्ये सर्वांनी सहभागी व्हायलाच पाहिजे, मी सहभागी होत आहे आणि तुम्ही?
योगेश्री नांदे, एएनसी, प्रथम वर्ष
आपले प्रथम कर्तव्य
आपल्या देशाचा मान राखणे आपल्या हातात आहे. गिनीज बुक ऑफ वल्र्ड रेकॉर्डमध्ये सामुहिक राष्ट्रगीत गाण्याची नोंद करण्यासाठी व जगभर राष्ट्रगीताचा नाद घुमण्यासाठी मी 26 जानेवारीला एमजीएम मैदानावर सकाळी 10 वाजता उपस्थित राहणार आहे. सर्वांनी येथे हजर राहणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे.
पूजा गिरी, एएनटीसी, प्रथम वर्ष
राष्ट्रप्रेम व्यक्त करायला विसरू नका
आपले राष्ट्रगीत आपल्याला संपूर्ण भारताची संपन्नता, विविधता, समृद्धीचे दर्शन घडवणारे आहे. या राष्ट्रगीतातूनच देशाची ओळख होते. कारण हे आपल्या देशाच्या एकतेचे, वीरांच्या बलिदानाची प्रचिती देणारे आहे. त्यामुळे आपले देशावर प्रेम असेल तर ते 26 तारखेला एमजीएमच्या मैदानावर सकाळी 10 वाजता व्यक्त करायला विसरू नका.
प्रिया कोल्हे
एकाच भावनेशी बांधणारे गीत
प्रत्येक गीत आपल्याला एक वेगळ्या भावनेशी बांधते. त्याचप्रमाणे राष्ट्रगीत प्रत्येकाला देशभक्तीच्या एकाच भावनेनेच बांधणारे आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन या गीताचे गायन आवश्यकच आहे. प्रत्येकाने देशासाठी किमान 52 सेकंद तरी राष्ट्रगीतासाठी द्यायला हवे.
कल्याणी राणगीते.
राष्ट्रगीतामध्ये मने जोडण्याची शक्ती
प्रत्येक व्यक्तीला दुसर्‍या व्यक्तीसोबत जोडण्याची शक्ती या गीतामध्ये आहे. रोज सकाळी एकदा तरी आम्ही सर्व मित्र-मैत्रिणी राष्ट्रगीत म्हणतो. दैनिक ‘दिव्य मराठी’ने हे गीत एकत्र म्हणायची जी संधी औरंगाबादकरांना उपलब्ध करून दिली आहे ती कुणीही दवडणार नाही. राष्टभक्ती दाखवायची ही वेळ आहे.
विक्रांत राजपूत
जगाला कळू द्या आपला आवाज
या अभियानात आपण सर्वांनी मोठय़ा प्रमाणावर सहभागी होणे आवश्यक आहे. दैनिक दिव्य मराठी राबत असलेल्या अभियनामध्ये मी आणि तुम्ही मागे राहून कसे चालेल? हुतात्मे व क्रांतिकारकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची हीच योग्य वेळ आहे. त्यामुळे मी राष्ट्रगीतासाठी हजर असेन. साईनाथ नवाते