आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाबासाहेबांच्या संकल्पनेतील प्रबुद्ध भारताची निर्मिती व्हावी : नेत्रपाल सिंग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - भारताच्या स्वातंत्र्याला ६७ वर्षे पूर्ण झाली, तरी प्रजासत्ताकाची अंमलबजावणी व्यवस्थित झाल्याने आजही सांप्रदायिकता आर्थिक विषमता या दोन समस्या कायम आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेल्या प्रबुद्ध भारताच्या संकल्पनेत मानवता देशाचे हित सामावले आहे, असे प्रतिपादन दिल्ली विद्यापीठातील इतिहासतज्ज्ञ प्रा. नेत्रपाल सिंग यांनी केले.
विद्यापीठात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ५८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. सिंग यांचे "भारत की सांप्रदायिक समस्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर के विचार और उनकी प्रासंगिकता' या विषयावर व्याख्यान झाले. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे अध्यक्षस्थानी होते. बीसीयूडीचे संचालक डाॅ. के. व्ही. काळे, परीक्षा नियंत्रक कॅप्टन डाॅ. सुरेश गायकवाड, विद्यार्थी कल्याण विभागाच्या संचालक डॉ. चेतना सोनकांबळे, संसद सचिव नामदेव कचरे, व्यवस्थापन परिषद सदस्य उल्हास उढाण यांची उपस्थिती होती.
डाॅ. सिंग म्हणाले, भारताला हजारो वर्षांचा इतिहास, सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे. धार्मिक संघर्ष सांप्रदायिकता पहिल्यापासून चालत आली आहे. हे चित्र आजही आपण बदलू शकलो नाही, हे दुर्दैवाने नमूद करावे लागते. बाबासाहेबांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात दलित, मागास, महिला यांच्या प्रगतीसाठी संघर्ष केला. सांप्रदायिक समस्यांचे मूळ शोधण्याचा प्रयत्नही बाबासाहेब यांनी केला. त्यांनी दिलेला विचारांचा वारसा आम्ही जतन तर करीत आहोत. तथापि, अंगीकार किती केला याचा विचार केला पाहिजे, असेही ते म्हणाले.
कुलगुरू डॉ. चोपडे म्हणाले, भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्वात मोठी राज्यघटना सादर करून प्रत्येक भारतीयाला स्वातंत्र्याचा अधिकार दिला. ही राज्यघटना विद्यापीठातील सर्व पदव्युत्तरअभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची घोषणा कुलगुरू डाॅ. चोपडे यांनी केली.