आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New Born Baby Found In Railway Station Aurangabad

आईने अर्भक फेकले, पोलिसांनी वाचवले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - बुधवारी रात्री रेल्वेस्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर रेल्वे रुळांमध्ये चारदिवसीय स्त्री जातीचे अर्भक टाकून निर्दयी मातेने पळ काढला. प्रवाशांनी माहिती दिल्यानंतर रेल्वे पोलिसांनी अर्भकाला घाटीत दाखल केले असून अर्भकाची प्रकृती ठणठणीत असल्याचे तिच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी सांगितले.

अर्भकाला रुळांच्या मधोमध टाकल्याचे कळताच जमादार एस. एन. ढवळे, हवालदार सय्यद जफर, शिपाई प्रल्हाद डफडे, दिगंबर राठोड, महिला पोलिस संतोषी राठोड व श्वेता दमके यांनी घटनास्थळी धाव घेतली. अर्भकाला ताब्यात घेत तातडीने घाटीतील वॉर्ड क्र. 24 मध्ये दाखल केले. याप्रकरणी रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद घेण्यात आली आहे.