आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादला 52 कि.मी. लांबीचा राज्यातील सर्वात मोठा नवा बायपास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - औरंगाबाद शहराबाहेरून 52 कि.मी. लांबीचा राज्यातील सर्वात मोठा बायपास होणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) या भव्य प्रकल्पाचे काम हाती घेतले आहे. तेराशे कोटी रुपये खर्चाच्या या रस्त्याचे काम वर्षअखेरीस किंवा 2014च्या सुरुवातीला सुरू होण्याची शक्यता आहे.

औरंगाबाद-धुळे या राष्ट्रीय महामार्गाचे काम प्रगतिपथावर आहे. यासोबतच शहरास आवश्यक असलेल्या आठपदरी बायपास रस्त्याचे काम एनएचआएने हाती घेतले आहे. सुरुवातीस रस्ता स्वतंत्रपणे करण्याचा निर्णय झाला होता. मात्र, टाऊनप्लॅनिंग विभाग आणि सिडकोने टाकलेल्या डेव्हलपमेंट प्लॅननुसार अनेक वसाहतींमधील घरे आणि खासगी मालमत्ता त्यात जात होत्या. त्या वाचवण्यासाठी आराखडा बदलला. सिडकोच्या विकास आराखड्यानुसार बायपासमध्ये 40 मीटरचा रस्ता होता. एनएचएआयने त्यात 20 मीटर वाढ करून वसाहती वाचवल्या आहेत. त्याऐवजी वाल्मीतील काही क्वार्टर्स व वन खात्याची जागा रस्त्यात जाणार आहे.

सध्या चर्चा सुरू, लवकरच निर्णय घेऊ : जिल्हाधिकारी
आऊटर रिंग रोडचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे आला आहे. सध्या त्यावर चर्चा सुरू आहे. बाहेरगावी जाणारी वाहने शहरात यायला नकोत यासाठी हे नियोजन आहे. येत्या काही दिवसांत त्यावर निर्णय घेतला जाईल, असे जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी सोमवारी पत्रकारांना सांगितले.

तीन ठिकाणी टोलनाके
जालना रोडपासून सुरू होणारा हा रस्ता कसाबखेडा फाट्यावर जुन्या मुंबई-नाशिक रोडला जोडला जाईल.
आडगाव, गांधेली, सातारा, कांचनवाडी, नक्षत्रवाडी, ए.एस.क्लब, भांगसीमाता, माळीवाडा, फतियाबाद, करोडीहून..
बीड बायपास रोडवरील निपाणी फाट्यापासून म्हणजेच सहारा सिटीमागून रस्ता सुरू होईल.

असा असेल नवा बायपास
21 वर्षे ठेकेदारास
0 रस्ता झाल्यानंतर 21 वर्षांच्या करारावर ठेकेदारास देणार.
0 रस्त्यासाठी एक झाड तोडल्यास तीन झाडे या हिशेबाने दुतर्फा वृक्षारोपण.

मार्गासाठी खर्च
750 कोटी रस्त्यासाठी
200 कोटी भूसंपादनासाठी
60 कोटी संपूर्ण विद्युतीकरणास
02 कोटी एक मोठा उड्डाणपूल व 20 लहान पूल उभारणीसाठी.
60 लाख सातार्‍यातील डोंगरात बोगदा खोदण्यासाठी.