आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या चार्लींना घालावी लागते जुन्या गाड्यांवर गस्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी बीट मार्शल पद्धत बंद करून ‘चार्ली’ हा नवा प्रकार पोलिस दलात आणला आहे. डोक्याला काळे फडके बांधलेले तरुण चार्ली रस्तोरस्ती दिसत असले तरी त्यांच्याकडील फटफट्या (मोटारसायकली) जुन्याच आहेत. २००२ मध्ये खरेदी केलेल्या या दुचाकी ताशी ६० किमी धावणे अशक्य आहे.

बुधवारी दुपारी एका दुचाकीस्वाराने पादचाऱ्याला धडक देऊन तो सुसाट निघाला. त्याचा चार्ली पाठलाग करू लागले, पण त्यांची दुचाकी बंद पडत होती. चार्लींशी चर्चा केली असता सर्वच दुचाकी जुन्या असल्याचे त्यांनी सांगितले.

दुचाकी गॅरेज नाही
शहर व ग्रामीणच्या पोलिसांसाठी स्वतंत्र यांत्रिकी कार्यशाळा असली तरी दुचाकीसाठी मात्र अशी कोणतीही व्यवस्था नाही. जो पोलिस कर्मचारी दुचाकी वापरतो त्यानेच ती दुरुस्ती करावी, असे अपेक्षित आहे. परंतु एखादी दुचाकी कोणाच्या हाती जाणार याची कल्पना नसते. त्यामुळे सुरू झालेली मोटारसायकल घेऊन जाणे एवढेच काम चार्ली करतात.

दुचाकी १३ वर्षे जुन्या
२००२ मध्ये पोलिस आयुक्तालयाने दुचाकी खरेदी केल्या होत्या. त्यानंतर खरेदी झाली नाही. मधल्या काळात जवानांची संख्या वाढली, पण दुचाकी वाढल्या नाही.

कशामुळे झाली दुरवस्था ?
>प्रत्येक दुचाकी चालक तीन किंवा चार महिन्यांनी सर्व्हिसिंग करतो.
>या कालावधीत दुचाकी ३ ते चार हजार किलोमीटर चालते.
>आताचे चार्ली महिनाभरातच एवढे किलोमीटर पूर्ण करतात. या गाड्या दोन शिफ्टमध्ये चालतात.
>या दुचाकी महिन्याला गॅरेजवर जायला हव्यात.
>बंद पडलेल्या दुचाकी मोबाइल व्हॅनमधून नेल्या जातात.

प्रस्ताव शासनाकडे
पोलिसांसाठी नवीन दुचाकींचे अनेक प्रस्ताव २००२ नंतर शासनाकडे पाठवण्यात आले. पोलिसांना बोलेरो, अलीकडे इर्टिका अशा मोटारी मिळाल्या, पण दुचाकी काही मिळाल्या नाहीत. त्यामुळे आहे त्यातच काम धकवण्यापलीकडे चार्लींकडे दुसरा कोणताही पर्याय नाही.

बीट मार्शलने केला वापर
यापूर्वी या दुचाकी बीट मार्शल तसेच वाहतूक पोलिसांच्या ताब्यात होत्या. तत्कालीन पोलिस आयुक्त संजयकुमार यांनी त्याना जीपीआरएस लावले होते. मात्र, नंतर ही यंत्रणा बंद झाली. त्यानंतर टपाल पाठवणे, न्यायालयात जाणे यासाठीच या दुचाकींचा वापर झाला.
बातम्या आणखी आहेत...