आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New Corporator Visit Aurangabad Corporatoin Office

नव्याने निवडून आलेल्या नगरसेविकांचे पतीसह मनपा दर्शन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - आता-आतापर्यंतनगरसेवक असणाऱ्या पुढाऱ्यांच्या घरात गुरुवारी मंत्रिमंडळात व्हावे तसे फेरबदल झाले आणि गृहिणींच्या नगरसेविका झाल्या. आज पहिल्या दिवशी घोषणापत्र सादर करण्याच्या निमित्ताने या नव्या नगरसेविकांनी पहिल्यांदा मनपात पतिराजांसह पाऊल ठेवले. काहीशा भांबावलेल्या या नगरसेविकांना त्यांचे पतिराज "ही पाहा माझी केबिन, आम्ही इथे बसायचो, ही महापौर, आयुक्तांची केबिन' असे सांगत दर्शनी मनपा समजावून सांगत होते.

काल महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. आज गॅझेटसाठी सर्व नगरसेवकांना घोषणापत्र सादर करण्यास सांगितले होते. निवडून आल्याचे प्रमाणपत्र इतर कागदपत्रांसह एक-एक नगरसेवक आज मनपात येत होते. गेल्या आठवड्यात स्मशानकळा आलेल्या मनपात आज चहलपहल होती. जाणते नगरसेवक सराईतपणे मनपात फिरत होते, तर नवीन नगरसेवक कार्यकर्त्यांसह नव्या कार्यक्षेत्रात आता पद घेऊन पाऊल ठेवताना काहीसे भांबावलेले दिसत होते.

मनपाच्या आवारात हास्यविनोद

नगर सचिवांच्यादालनात जाऊन परतत असताना भाजपचे मावळते नगरसेवक बालाजी मुंडे नगरसेविका मनीषा मुंडे यांच्यासह दाखल झाले. नागरे दांपत्यासह हास्यविनोद झाले. पत्नीला नगरसेवक बनवून आलेले सुरेंद्र कुलकर्णीही त्यांच्यात सामील झाले. मग मुंडे दांपत्याची मनपा दर्शन सहल झाली. तेथेही पुन्हा तेच केबिनींची माहिती देणे आपण कुठे बसत असू हे सांगणे आलेच. पाऊण तासाच्या या मनपा दर्शनानंतर काहीशा उत्साहित काहीशा भांबावलेल्या नवीन महिला नगरसेविका ‘अहों' ना सोबत घेऊन लगबगीने घराकडे रवाना झाल्या.

पत्नीच्या दिमतीला पतिराज!

नव्यानेनिवडून आलेल्या नगरसेविका पतिराजांसह येत होत्या. मावळत्या मनपातील नगरसेवकांच्या पत्नीही या निवडणुकीत निवडून आल्या आहेत. ते त्यांच्या दिमतीला होते. मावळते सभागृह नेते किशोर नागरे नगरसेविका पत्नी स्वाती नागरे यांच्यासह दाखल झाले. नमस्कार चमत्कार करीत किशोर नागरे यांनी त्यांना आपले दालन दाखवले. दारावरची पाटी दाखवली. इतर दालनांची माहिती दिली. कोण कोठे बसतो याची माहिती दिली.