आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पभूधारकांच्या जमिनीवरील आरक्षणे शासकीय भूखंडांवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - अठ्ठावीस गाव झालरक्षेत्र प्रारूप आराखड्यावरील आक्षेपांवर सुनावणीसाठी नियुक्त केलेल्या झालरक्षेत्र नियोजन समितीने आराखड्यात 800 पेक्षा अधिक दुरुस्त्या सुचवल्या आहेत. यात अल्पभूधारक शेतक-यांच्या जमिनीवरील आरक्षणे हटवून जास्तीत जास्त आरक्षणे शासकीय जमिनींवर प्रस्तावित केली आहेत. प्रारूप आराखडा अंतिम मंजुरीसाठी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांकडे पाठवण्यात आला.

सिडकोने तयार केलेला झालरक्षेत्र प्रारूप आराखडा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रद्द केला होता. त्यानंतर नगररचना विभागाचे औरंगाबादचे तत्कालीन उपसंचालक ए. जे. नाझिरकर यांनी नवीन आराखडा तयार केला. सहा सेक्टरमध्ये तयार करण्यात आलेल्या या आराखड्यावर 2227 पेक्षा जास्त आक्षेप नोंदवण्यात आले. झालरक्षेत्र आराखड्यावर सिडकोत ऑक्टोबर 2013 सुनावणी पार पडली. एकट्या सातारा व देवळाई परिसरातून 50 टक्के म्हणजेच 1100 आक्षेप
आले होते.

गावे : जटवाडा, ओव्हर, इस्लामपूर
अपेक्षित लोकसंख्या : 17 हजार, ओव्हर येथील शॉपिंग मॉल गट नं. 199, 242 वर स्थलांतरित केले, तर येथील प्राथमिक शाळा, खेळाचे मैदान, उद्यान आदी आरक्षणे वगळून निवासी क्षेत्र घोषित केले. जटवाडा भागातील निवासी क्षेत्र शेतीसाठी, तर बहुतांश शेतीचे क्षेत्र निवासी म्हणून समावेश केला.
गावे : अश्रफपूर, सावंगी, तुळजापूर, कृष्णापूरवाडी. लोकसंख्या 52 हजार, सावंगीतील गट नं. 31 व 32 एक हेक्टर जागेवरील व्यावसायिक कॉम्प्लेक्सचे आरक्षण वगळून ती जागा निवासी वापरासाठी ठेवली. उद्याने, खेळाची मैदाने, रुग्णालये इतरत्र हलवली. सावंगीतील स्टेडियम (47) गट नं. 41, 42, 43, 45 येथे हलवून यापूर्वीची 120, 122, 123, 124, 125 व 126 या गटांतील जागा ही शेतीसाठी ठेवली आहे.
गावे : पिसादेवी, गोपाळपूर, साजापूर, अंतापूर, मांडकी, दौलतपूर, मल्हारपूर, रामपूर, कच्च्ीघाटी, सुलतानपूर, हिरापूर, फत्तेपूर
लोकसंख्या : 71 हजार, पिसादेवी येथील गट नं. 125, 126, 127 वरील बस डेपो आणि स्थानकाचे आरक्षण गट नं. 127 व 128 वर हलवण्यात आले. पूर्वीची 1.2 हेक्टर जमीन निवासी क्षेत्रात समाविष्ट केली. पार्किंग गट नं. 119 वर स्थलांतरित केली असून 19.40 हेक्टरवरील स्टेडियम मांडकीच्या गट. नं. 23 वर स्थलांतरित केले आहे. पिसादेवीची जमीन (गट नं. 7, 8, 9, 119, 120, 135, 136, 138) निवासी व इतर वापरासाठी राखीव ठेवली आहे. दफनभूमी व स्मशानभूमीचे आरक्षण रद्द केले असून, साजापूर येथील गट नं. 26 वरील स्मशानभूमी अंतापूर येथे हलवण्यात आली आहे. पिसादेवी, गोपाळपूर, मांडकी, साजापूर अंतापूर, रामपूर, हिरापूर येथील पन्नास गट नंबरवरील निवासी क्षेत्र कृषीत समाविष्ट केले आहे. याच भागातील साठपेक्षा अधिक कृषी मालमत्ता निवासी करण्यात आल्या.