आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डासांचे जनुक बदलून डेंग्यूशी लढा!, ब्रिटिश कंपनी आॅक्सिटेकचा प्रयोग; एडिस इजिप्तीचा डीएनए बदलला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंंगाबाद - जगाला सतावणाऱ्या डेंग्यू या भयानक रोगावर नियंत्रण मिळवणारे अफलातून संशोधन ब्रिटिश बायोटेक फर्म आॅक्सिटेकने तडीस नेले आहे. डेंग्यू रोगाच्या विषाणूचा वाहक असलेल्या एडिस इजिप्ती डासाच्या मादीचे जनुक बदलून तिच्या डीएनएमध्ये सेल्फ डिस्ट्रक्ट मेेकॅनिझम विकसित करण्यात आॅक्सिटेकने यश मिळवले आहे. यामुळे संपूर्ण जगात डेंग्यूवर नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे. हा प्रयोग जगाची डेंग्यूपासन मुक्तता करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

चार प्रकारचे विषाणू
डेंग्यूचे विषाणू हे एडिस इजिप्तीच्या माध्यमातून एका रुग्णातून दुसऱ्या रुग्णात जातात. या प्रक्रियेत डासाची मादी वाहकाची भूमिका बजावते. डेंग्यू-१, डेंग्यू-२, डेंग्यू-३ आणि डेंग्यू-४ आदी डेंग्यूचे चार प्रकारचे विषाणू आहेत. या विषाणूंचा फैलाव रोखण्यासाठी आॅक्सिटेकने एडिस इजिप्तीच्या जनुकात बदल केले असून डेंग्यूचा फैलाव झालेल्या देशांत जेनेटिकली माॅडिफाइड डास सोडले आहेत. या डासाचे नाव ओएक्स५१३ए असे ठेवण्यात आले आहे.
कशी यंत्रणा आहे?
- अंड्यातून बाहेर पडलेले डास प्रजोत्पादनास सक्षम होण्यापूर्वीच मरतात. परिणामी डासांच्या संख्येवर नियंत्रण शक्य होते. जनुकीय बदलामुळे हे घडते.आॅक्सिटेकने दोन प्रकारचे जीन बनवले.
- या प्रकारात एडिस इजिप्तीचा नर डास माणवाला चावत नाही. आॅक्सिटेकने या नराची निवड केली. त्याच्यावर प्रयोग करून वातावरणात सोडले.
- या डासाच्या मादीचे मेटिंग नराशी फक्त एकदाच होते. नर प्रजोत्पादनक्षम नसल्याने मादीची प्रजोत्पादन प्रक्रिया खंडित होते.