आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रणवीरची मिशी आणि हनी सिंहच्या हेअरस्टाइलची तरुणाईला भुरळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एखादा ट्रेंड आला तर तो वार्‍यासारखा पसरतो. केस आणि मिशांच्या स्टाइलबाबत तर हे सूत्र तंतोतंत लागू पडते. शहरातील महाविद्यालयीन तरुणांमध्ये रणवीरची मिशी व हनी सिंहच्या हेअर स्टाइलची क्रेझ दिसून येत आहे.

कॅनॉटमधील क्लासिक हेअर सलूनचे मालक हृषीकेश तोडकर यांनी सांगितले की, फॅशनमध्ये नवीन काय आहे याकडे तरुणांचा जास्त कल असतो. जे नवीन सुरू आहे तेच करा, असे सांगितले जाते. रामलीलामधील लूकसारखा मिशांना पीळ देऊन तो ब्राऊन शेडमध्ये करण्याची मागणी वाढली आहे. सध्या हनी हेअरस्टाइल प्रसिद्ध आहे. याबरोबरच रोनाल्डो, विराट कोहली आणि एक व्हिलन या स्टाइलचीसुद्धा मुलांकडून मागणी असते. हा कट शंभर ते पाचशे रुपयांपर्यंत केला जातो. आतापर्यंत मी चारशे मुलांचे असे कट केले आहेत.
यादेखील आहेत आवडत्या रचना
पमिंग स्टाइल : केस कुरळे करून त्यांना दोन शेडमध्ये रंगवले जाते. केसांचे पमिंग करणे किंवा कर्ली करणे सध्या फेमस आहे.

कोरीव दाढी : मिशांना टोकदार पीळ देऊन दाढीदेखील कोरीव ठेवली जाते.
चक्की स्टाइल : उन्हाळ्यात घाम येत असल्यामुळे डोक्यावरील संपूर्ण केस काढण्याचे म्हणजेच चक्की करण्याचे स्टाइलही तरुणाईत दिसून येते.

- रामलीला सिनेमातल्या रणवीर सिंहचा लूक खूप आवडला. त्याच्यासारख्या लूकमुळे मित्र मला रणवीर सिंह म्हणू लागले आहेत.काहीतरी वेगळे असले तर लोक आपल्याला पाहतात, हे यामागचे कारण आहे. राजेश वैष्णव
स्पाइक : आमिर खानने ‘दिल चाहता है’ या चित्रपटात बारीक केस ठेवले होते ही स्पाइक स्टाइल तरुणांना आजही आवडते. याचबरोबरच आमिर खानने हनुवटीवर केसांचा बारीक ठिपका याच चित्रपटात ठेवला होता. हा बारीक ठिपका तर तरुणाई तिळासारखा वापरत असल्याने ही स्टाइल सर्वात लोकप्रिय आहे.
वेणी स्टाइल : संपूर्ण केस बारीक करून महिलाच्या वेणीसारखे केस ठेवले जातात. लुंगी स्टाइल डान्ससारखेही पोनी स्टाइलचे क्रेझ आहे.
- मिशा वेगळ्या पद्धतीने ठेवल्या, तर त्या लूकची संपूर्ण कट्टय़ावर चर्चा होते. त्यामुळेच आम्ही सातत्याने नवा लूक ठेवतो. आमच्या ग्रुपमध्ये सातत्याने नव्या लूकचीच चर्चा होत असते. रणवीर सिंहचा रामलीला पाहिल्यानंतर त्याच्यासारखा लूक करण्याचे ठरवले. आनंद पाठक
- हनी सिंह हा माझा आवडता स्टार आहे. त्याचे ब्ल्यू आइज गाणे पाहिल्यावर तशी कट केली. ही स्टाइल लोकप्रिय असल्यामुळे फ्रेंड सर्कलमध्ये कोणी चिडवत नाही. मात्र, घरच्यांची बोलणी खावी लागतात. -किशोर काटे
- शाहरुख, सलमानसारखे संपूर्ण चेहरा चकोट करण्याला तरुणाई आधी प्राधान्य देत होती. चॉकलेटी इमेज ठेवण्याकडेच जास्त कल होता. मात्र, ‘रामलीला’ चित्रपटानंतर चकोट राहण्याची क्रेझ कमी झाली. आता रणवीरच्या पिळदार मिशांचा लूक आणि हनी सिंहची हेअरस्टाइल तरुणाईला भावत आहे.