आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन वर्षात पोलिसांना नव्या सदनिकांचे वाटप - राजेंद्र सिंह

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पोलिस आयुक्तालयाची इमारत चार मजली होणार आहे. त्याचा प्रस्ताव मान्य झाला असून त्यासाठीचे डिझाईन आणि नियोजन सुरु आहे. ही इमारत प्रत्यक्षात येण्याकरीता दोन वर्ष लागणार आहे. यासाठी चार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. अशी माहीती पोलिस आयुक्त राजेंद्र सिंह यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.

या पोलिस आयुक्त आवारातील कर्मचाऱ्यांच्या घरकुलाचे काम पूर्ण झाले आहे. २ बीएचके ५६ सदनिका तयार झाल्या असून ज्यांचे घर पडले आहेत अशा कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांबितले. या शिवाया पोलिस स्कूलमध्येही वर्गाची संख्या वाढवण्यात येणार आहे. यात ५० टक्के कर्मचाऱ्यांचे आणि ५० टक्के सामान्याचे पाल्य असणार आहेत. एका वर्गात केवळ ४० विद्यार्थी संख्या ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता टिकून राहील असे आयुक्तांनी सांगितले.